गुरुजी बनतील शेतकरी ! आता शाळेत शिकवण्यासोबतच शिक्षकांना शेती पिकवण्यासाठी मिळणार 10 हजाराची प्रोत्साहन रक्कम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची त्यांच्या ज्ञानाने जडणघडण करत असतात. खऱ्या अर्थाने ते आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. आता शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानानेच नाही तर त्यांच्याजवळ असणाऱ्या शेती कसण्याच्या कसबीने देखील उत्तमरित्या घडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. खरं पाहता आता शिक्षकांना शिकवण्यासोबतच शेती कसण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

यासाठी शिक्षकांना कोणत्याच वावरात, शेतात जाण्याची आवश्यकता राहणार नाही तर शिक्षकांना शाळेच्या परिसरात परसबाग फुलवावी लागणार आहे. या परसबागेत शिक्षकांनी उत्पादित केलेला भाजीपाला शाळेतील पोषण आहारात वापरला जावा असा दृष्टीकोन बाळगून राज्यभरातील शाळांसाठी शासनाने परसबाग स्पर्धा घोषित केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र शासनाकडून शालेय पोषण आहार योजनेला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नवीन नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या योजनेत केंद्र शासनाकडून अनेक बदल देखील सुचवले गेले आहेत. यामध्ये शाळेच्या परिसरात परसबाग फुलवून तेथे उत्पादित होणारां भाजीपाला विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उपयोगात आणला जावा अशी देखील सूचना आहे.

या अनुषंगाने राज्य शासनाने कंबर कसली आहे. यासाठी परसबाग स्पर्धा आयोजित झाली आहे. यामध्ये राज्यातील शिक्षकांना शाळेच्या परिसरातील परसबागेत भाजीपाला तसेच फळझाडे लागवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही लागवड करण्यात आलेली फळझाडे आणि भाजीपाला विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वापरली जावीत असे देखील सांगितले गेल आहे.

याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परसबागेमुळे विद्यार्थ्यांना ताजी फळे आणि भाजीपाला मिळणार असल्याने ते अधिक आनंदाने शाळेतील पोषण आहार सेवन करतील. दरम्यान यासाठी परसबाग स्पर्धेचे जे आयोजन झाले आहे ती स्पर्धा जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.

या स्पर्धेतं सर्वात आधी केंद्रीय स्तरावरून उत्तम परसबागेची निवड केली जाणार आहे. यानंतर जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तालुकास्तरावर परसबाग स्पर्धा होईल त्यानंतर जानेवारीच्या शेवटी जिल्हास्तरावर ही स्पर्धा होणार आहे.

या परसबाग स्पर्धेची मोठी विशेषता म्हणजे या स्पर्धेत बक्षिसाचे देखील वितरण केल जाणार आहे. यामुळे उत्तमरीत्या परसबाग फुलवण्यासाठी शिक्षकांना तसेच शाळांना प्रोत्साहन मिळणार आहे. तालुकास्तरावर प्रथम बक्षीस 5000, द्वितीय 3000 आणि तृतीय 2000 असं बक्षीस वितरण राहणार आहे. जिल्हास्तरावर मात्र प्रथम बक्षीस दहा हजार, द्वितीय 7000, तृतीय 5000 असं स्वरूप राहील.

निश्चितच उत्तम परसबाग फुलून शाळांना बक्षीस प्राप्त करण्याची संधी राहणार आहे. तसेच यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे पोषण सुधारण्यास मदत होईल, यामुळे विद्यार्थ्यांना नैसर्गिक आणि सेंद्रिय भाजीपाला चाखण्यास मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत चांगले शिक्षण आणि चांगला पोषण आहार मिळणार आहे. शाळेत परसबाग फुलवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन देखील शाळांना लाभणार आहे.

शाळेत जर पुरेसा परिसर भाजीपाला उत्पादित करण्यासाठी नसेल तर शाळेच्या छतावर किंवा वरंडात परसबाग फुलवली जाणार आहे. एकंदरीत शासनाची ही अनोखी योजना शिक्षकांसमवेतच विद्यार्थ्यांसाठी देखील अति महत्त्वाची राहणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील मदत होऊ शकते, म्हणून या योजनेचे जाणकारांकडून कौतुक केले जात आहे.