अहमदनगर : जिल्ह्याच्या ‘या’ तालुक्यातील रस्ते कामासाठी आणखी 21 कोटी 75 लाखाचा निधी ; मागील आठवड्यातचं 32 कोटी 36 लाख मिळालेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष फायद्याच्या ठरणाऱ्या महामार्गांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान राज्याच्या ग्रामीण भागातील रस्ते विकासाची कामे देखील आता वेग धरत असल्याचे चित्र आहे.

यामध्ये नुकतेच एका आठवड्यापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून देखील ग्रामीण भागातील रस्ते विकासाच्या कामासाठी तिची उपलब्धता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी करून दिली जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यासाठी देखील नुकत्याच एका आठवड्यापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत वेगवेगळ्या रस्त्यांच्या विकासासाठी 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पुन्हा एकदा संगमनेर तालुक्याचे नशीब चमकल असून तालुक्यासाठी 21 कोटी 75 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाची कामे जोमात सुरू होणार असल्याचे चित्र आहे.

नुकत्याच मंजूर झालेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या पावणे 22 कोटी रुपयांच्या निधीतून रणखांबवाडी फाटा- रणखांबवाडी ते कुंभारवाडी वरवंडी या 15 किलोमीटर रस्त्यासाठी 11 कोटी 25 लाख रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच राजापूर ते राष्ट्रीय महामार्ग 50 चिखली 5 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 75 लाख रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय तालुक्यातील इतरही प्रलंबित रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती दिली जात आहे. संगमनेर तालुक्यासाठी उपलब्ध झालेला हा निधी बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाला असल्याचा दावा इंद्रजीत थोरात यांनी केला आहे.

निश्चितच लोकप्रतिनिधी या नाते थोरात यांनी रस्त्यांसाठी पाठपुरावा करत पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत केली असल्याने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते उजळून निघतील यात तीळ मात्र देखील शंका नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अजूनच सोयीची होणार आहे.

मोठमोठ्या महामार्गाच्या विकासात कुठे ना कुठे ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांचा विसर सरकारला पडत होता. मात्र वारंवार जनतेने लोकप्रतिनिधींकडे आणि लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी मागणी उचलून धरली याचाच परिणाम म्हणून संगमनेर तालुक्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा फंड मिळाला आहे.