उद्या 4 जून 2024 या रोजी देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात देखील मोठ्या घडामोडी घडू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मोठे चढ-उतार होतील अशी देखील शक्यता असून शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असून चांगले पैसे मिळवण्याची संधी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
या सगळ्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिले तर येणारा आठवडा हा शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाचा ठरेल अशी शक्यता आहे. कारण या आठवड्यामध्ये शेअर बाजारातील आयपीओ येणार असून यामध्ये एक मेनबोर्ड आयपीओ तर दोन आयपीएल क्षेत्रातील असणार आहेत.
सध्या जर आपण शेअर बाजारातील तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्यानुसार सध्या शेअर बाजारामध्ये अस्थिरता आहे.परंतु तरी देखील काही आयपीओ चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आपण या लेखात या आठवड्यात येऊ शकणाऱ्या आयपीओ बाबत थोडक्यात माहिती घेऊ.
आगामी आठवड्यात येणार हे आयपीओ
1- मॅजेंटा लाइफकेअर आयपीओ– येणाऱ्या पाच तारखेपासून म्हणजेच पाच जून पासून या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांकरिता गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. साधारणपणे सात जून पर्यंत या आयपीओ मध्ये पैसे गुंतवता येणे शक्य आहे. जर आपण या आयपीओची प्राईस पाहिली तर ती 35 रुपये प्रति शेअर इतके आहे.
2- सॉट्रिक्स आयपीओ– येत्या पाच तारखेला हा आयपीओ खुला होणार असून सात जून पर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणे शक्य आहे. आयपीओ एसएमई सेगमेंट मधील असून या माध्यमातून कंपनी एकूण 18 लाख शेअर्स इशु करणार आहे. या आयपीओची किंमत प्रति शेअर 121 रुपये आहे.
3- क्रोनॉक्स लॅऐब सायंसेज आयपीओ– आज हा आयपीओ सबस्क्रिप्शन साठी खुला होणार असून 5 जून पर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. जर आपण या आयपीओची प्राईस लॉट म्हणजेच किंमत पट्टा पाहिला तर ते 129 ते 136 रुपये प्रति शेअर असणार आहे.
4- असोसिएटेड कोटर्स आयपीओ– हा आयपीओ 30 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे व आज म्हणजे तीन जून याची गुंतवणुकीसाठी ची शेवटची तारीख आहे. या आयपीओच्या किंमत पट्टा 121 रुपये असून कंपनी 5.11 कोटींच्या या आयपीओच्या माध्यमातून 4.22 लाख शेअर्स विकणार आहे.