महाराष्ट्राच्या शिरेपेचात मानाचा तुरा ! ‘या’ कोस्टल रोडमुळे राजधानी मुंबईच्या वैभवात भर; प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण; पहिला टप्पा ‘या’ दिवशी होणार खुला, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Coastal Road : राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या वैभवात लवकरच एक मोठी भर पडणार आहे. स्वप्ननगरी, मायानगरी, फायनान्शिअल इन्स्टिट्यूशनचे हब मुंबई मेरी जान अलीकडे ट्रॅफिक जामच्या विळख्यात अडकली आहे. वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस राजधानी मुंबईत पाहायला मिळत आहे. यामुळे राजधानी मुंबईत वेगवेगळी रस्ते विकासाची कामे सध्या जोरात सुरू आहेत.

सागरी मार्ग, भुयारी मार्ग, खाडी पूल, सागरी पूल, उड्डाणपूल विकसित करून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मुंबईच्या सागरी किनाऱ्यालगत कोस्टल रोड अर्थातच सागरी किनारी मार्ग विकसित केला जात आहे. मुंबईत जागेचा अभाव पाहता सागरी किनाऱ्यागत रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. दरम्यान आता या रस्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोस्टल रोड प्रकल्प काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. या चालू वर्षात जवळपास या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत हा पहिला टप्पा पूर्णपणे बांधून तयार होईल आणि याचे लोकार्पण पुढील वर्षी होईल अशी माहिती विश्वासनीय सूत्रांच्या माध्यमातून एका मीडिया रिपोर्टमधून पुढे येत आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाविषयी थोडक्यात 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा प्रकल्प बीएमसीच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे. यासाठी 12721 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे – वरळी सी लिंक वरळीच्या टोकापर्यंत विकसित केला जाणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी फुटणार आहे. हा मार्ग एकूण 10.58 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्प अंतर्गत बोगद्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.

तसेच कोस्टल रोडला समुद्रामध्ये येणाऱ्या भरती ओहोटीचा किंवा समुद्रा लाटांमुळे आणि पोहोचू नये यामुळे समुद्र भिंती विकसित केल्या जात आहेत. या भिंतींचे काम जवळपास 71 टक्के पूर्ण झाले आहे. याशिवाय या प्रकल्पासाठी 111 हेक्टर क्षेत्रावर भराव घालण्यात आला आहे. तसेच या कोस्टल रोडवर हाजी अली महालक्ष्मी आणि वरळी या ठिकाणी पार्किंगची देखील सुविधा राहणार आहे. हा रस्ता चार लेनचा आहे आणि चार लेन डाऊन आहे.

विशेष म्हणजे चार लेन पैकी एक लेन बी आर टी एस आणि रुग्णवाहिकेसाठी ठेवण्यात आली आहे. जरी हा रस्ता चार लेनचा असला तरी देखील बोगद्या खालून हा रस्ता तीन लेनचा करण्यात आला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे 4 किमीचा ऍप्रोच रोड आणि 4 किमीचा बोगदा आहे ज्यामध्ये 2 किमी समुद्र आणि डोंगराच्या खाली आहे आणि 2 किमीचा रॅम्प बोगदा आहे जो गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत आहे.

प्रकल्पाच्या विशेषता

वास्तविक समुद्रकिनारी लगत विकसित होणारा हा रस्ता मोठा हायटेक असून याच्या एक ना अनेक विशेषता आहेत. यामध्ये चार ठिकाणी कार पार्किंगची व्यवस्था आहे. या पार्किंग एरिया मध्ये 1800 वाहने उभी केली जाऊ शकतात. हाजी अली, वरळी आणि इमर्सन गार्डन या ठिकाणी इंटरचेंज आहेत. या गर्दीच्या ठिकाणी इंटरचेंज राहणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. या मार्गाची विशेषता म्हणजे भविष्यात वाहनांची गर्दी वाढली तर यामध्ये लेन ऍडजेस्ट करता येणार आहे.

यासाठी एक्स्ट्रा पॅच रस्त्यामध्ये देण्यात आला आहे. तसेच या मार्गाची एक मोठी विशेषता म्हणजे या मार्गावर तब्बल 16 ठिकाणी पायी चालणाऱ्या लोकांना अंडरपास उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय ठीक ठिकाणी योगा पार्क, सायकलिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक देखील विकसित होत आहेत. निश्चितच हा कोस्टल प्रकल्प मुंबईच्या वैभवात भर घालणारा असून यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेच्यात अजून एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. सध्या स्थितीला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून याचा पहिला टप्पा हा पुढल्यावर्षी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

निश्चितच राजधानी मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बीएमसीच्या माध्यमातून तसेच राज्य रस्ते विकास महामंडळ आणि इतर स्थानिक प्राधिकरणाच्या माध्यमातून जी काही रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत ती कामे पुढील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुंबईकरांना निश्चितच आगामी काही दिवसात कोस्टल रोड सारख्याच इतर काही बहुउद्देशीय प्रकल्पांची भेट मिळणार आहे.