कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महागाई भत्ता ठरवण्यासाठी कोणता फॉर्मुला वापरला जातो ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dearness Allowances Formula : सरकारी कर्मचाऱ्यांना मूळवेतना सोबतच महागाई भत्ता देखील दिला जात असतो. विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा हा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी वाढवला जातो. यामध्ये जानेवारी महिन्यात पहिल्यांदा वाढ मिळते आणि त्यानंतर जून महिन्यात दुसऱ्यांना वाढ दिली जाते.

दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. चार टक्के दराने महागाई भत्ता वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकते असा मीडिया रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे.

म्हणजे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% ऐवजी 42 टक्के एवढा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून मिळणार आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अनुज्ञय झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील ही महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. दरम्यान आज आपण महागाई भत्ता कसा ठरवला जातो किंवा मोजला जातो याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कसा ठरवला किंवा मोजला जातो महागाई भत्ता? 

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महागाई भत्ता कसा मोजला जातो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की महागाई भत्ता दर निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने एक फॉर्मुला विकसित केला आहे. {(गेल्या 12 महिन्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष -2001 = 100) -115.76)/115.76} x 100. या ठिकाणी लक्षात ठेवा की सामाजिक उपक्रमांच्या डीए साठी वेगळा फॉर्मुला वापरला जातो.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! जानेवारीपासून वाढणारा महागाई भत्ता 3% नाही तर ‘इतका’ वाढणार, वेतनात होणार मोठी वाढ