शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! शेततळे बनवण्याचा विचार करताय ना? मग शेततळ्यासाठी जागा कशी निवडायची, एकदा वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farm Pond : शेती ही पाण्याविना अशक्य आहे. मात्र भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत अनेकदा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध राहत नाही. यामुळे पीक उत्पादनात घट होते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसतो. उन्हाळ्यात फळबाग जोपासण्यासाठी पाण्याची गरज असते आणि शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नसल्याने फळबाग जोपासणीत अडचणी निर्माण होतात.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधव शेततळे बनवण्याचा निर्णय घेतात. शेततळ्यामुळे निश्चितच रब्बी हंगामातील तसेच उन्हाळी हंगामातील पिकांसाठी शाश्वत पाणी उपलब्ध होते शिवाय फळबाग पिकांना देखील पाण्याची उपलब्धता होत असते. पाण्याची उपलब्धता राहिल्यास निश्चितच रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन घेता येते.

फळबाग पिकांमधून देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन यामुळे घेता येणे शक्य होते. मात्र अनेकदा शेततळे बनवताना शेतकरी बांधव जागेची निवड करताना चुकतात. चुकीच्या जागेवर शेततळ्याची निर्मिती झाल्यानंतर शेततळे अधिक काळ टिकत नाही. परिणामी शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च वाया जातो. यामुळे आज आपण शेततळे कोणत्या जागेवर नेमके उभारले पाहिजे याविषयी थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेततळ्यासाठी अशी जागा निवडा

शेततळ्यासाठी जागा कशी निवडायची असे प्रश्न अनेकदा शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जातात. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की शेततळे ज्या ठिकाणी पाणी पाजण्याचे प्रमाण कमी असते अशा ठिकाणी बनवावे. म्हणजे काळी चिकन माती असलेली जमीनीवर तळे बनवणे चांगले असल्याचे सांगितले जाते.

शेततळे जमिनीच्या उतारावरील जागेवर बनवणे उपयुक्त ठरते. मात्र मुरमाड, वालुकामय, सचिद्र खडक किंवा खारवट जागा शेततळ्यासाठी निवडू नये. यामुळे शेततळे बाधित होऊ शकते. अशा जागेवर शेततळे उभारल्यास अधिक काळ शेततळे टिकत नाही.

शेततळ्यातील पाण्याचा निचरा टाळण्यासाठी शेततळ्याला अस्तरीकरण करणे गरजेचे राहते. अलीकडे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून शेतकऱ्यांना शेततळे अस्तरी करण्यासाठी अनुदान देखील दिले जात आहे. या अनुदानाचा लाभ घेऊन शेतकरी शेततळे अस्तरीकरणाचे काम देखील करू शकतात.

शेततळे निर्मितीसाठी नेहमी खोलगट आणि शेताच्या खालच्या बाजूची जमीन निवडावी. अशा जागेवर नेहमी शेततळे उभारावी ज्या जागेवर सर्व पाणी एकत्र येईल. किंवा विहिरीतील पाणी शेततळ्यात साठवताना सहज शक्य होईल अशी जागा निवडावी.