Genealogy: वंशावळ म्हणजे काय? वंशावळ कशी काढली जाते? वंशावळीचा उपयोग कशासाठी होतो? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Genealogy:- कुठलेही सरकारी कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला इतर काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते व अर्ज करताना आपल्याला ही महत्त्वाची कागदपत्रे अर्जाला जोडावी लागतात. याच अनुषंगाने जेव्हा आपण जातीचा दाखला काढतो तेव्हा जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करताना आपल्याला इतर कागदपत्रांसोबत वंशावळ जोडणे अत्यावश्यक असते. वंशावळीशिवाय तुम्हाला जातीचा दाखला मिळू शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे वंशावळ म्हणजे नेमके काय आणि ती कशा पद्धतीने काढली जाते? इत्यादी बद्दल महत्वाची माहिती या लेखात आपण बघणार आहोत.

 वंशावळ म्हणजे नेमके काय?

साधारणपणे अगदी साध्या आणि सरळ भाषेमध्ये जर समजून घ्यायचे असेल तर आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक वेळीच्या व्यक्तीचा नावाचा क्रमवार लिहिलेला आराखडा किंवा माहिती म्हणजे वंशावळ होय असे आपल्याला म्हणता येईल किंवा आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आत्ता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंत क्रम हा उतरत्या स्वरूपामध्ये लिहिलेला असणे याला देखील आपण वंशावळ म्हणू शकतो.

वंशावळ ही जातीच्या दाखल्यासाठी खूप महत्त्वाचे कागदपत्र समजले जाते. वंशावळीशिवाय जातीचा दाखला निघूच शकत नाही. तुमच्या कुटुंबाच्या अगोदरच्या पिढ्यांची ओळख म्हणजेच वंशावळ होय. जात वैधता प्रमाणपत्राकरिता देखील वंशावळ लागतेच.

 वंशावळ कशी काढली जाते?

वंशावळ काढण्यासाठी सगळ्यात आधी म्हणजे कुटुंबातील अगोदरच्या पिढीतल्या पहिल्यापासून ते आत्तापर्यंत अस्तित्वात असलेल्या व्यक्तींचा उतरत्या क्रमाने लिहिणे गरजेचे असते. म्हणजेच उदाहरणच घ्यायचे झाले तर अगोदर यामध्ये खापर पणजोबा, पणजोबा, त्यानंतर आजोबा, आजोबांची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावे उतरत्या क्रमाने लिहिणे गरजेचे असते. म्हणजेच सोप्या भाषेत म्हणायचे म्हटले म्हणजे जातीचा दाखला ज्या व्यक्तीच्या नावाने काढायचा आहे

त्या व्यक्तीच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहिणे गरजेचे असते. जेव्हा आपण कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसी सर्टिफिकेट काढतो तेव्हा आपल्या पूर्वजांच्या नावासमोर कुणबी लिहले आहे की नाही याचा शोध आपण घेतो व त्या पद्धतीने आपण वंशावळ काढत असतो. साधारणपणे निजामकालीन नोंदी शोधण्याचे काम हे महसूल विभागाच्या माध्यमातून होते व याचे रेकॉर्ड तहसील कार्यालयात जुने हक्क नोंदण्यांमध्ये देखील मिळते.

तसेच कोतवालाच्या रजिस्टरमध्ये किंवा बुकमध्ये जन्ममृत्यूची नोंदवही असते व त्या ठिकाणी देखील पूर्वजांचा सगळा इतिहास किंवा माहिती आपल्याला मिळू शकते. तसेच जुन्या ज्या काही शैक्षणिक नोंदी असतात त्यामध्ये देखील पूर्वजांच्या जातींचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. अशा ठिकाणाहून तुम्ही वंशावळ काढू शकतात.

 वंशावळ ही कशासाठी आवश्यक असते?

आपण शिक्षणासाठी जेव्हा एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायला जातो त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र लागते व त्याकरिता जुने रेकॉर्ड खूप महत्त्वपूर्ण ठरते. कारण जुन्या रेकॉर्डमध्ये नावा समोर जातीचा उल्लेख असायचा. तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र अर्थात कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट साठी देखील वंशावळ आवश्यक आहे. साधारणपणे वंशावळ काढण्याच्या जबाबदारीचा विचार केला तर ती आपली स्वतःचीच म्हणजेच अर्जदाराची असते.

वंशावळ ही अर्जदाराने स्वतःहून लिहायची असते यासाठी कुठेही अर्ज वगैरे करण्याची गरज नसते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील पूर्वजांच्या नावासमोर किंवा कुटुंबातील व्यक्तींपैकी कुणाची कुणबी नोंद आढळून आली तर त्याच्या पुढच्या पिढ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे शक्य होते.

म्हणजेच एखाद्या भागामध्ये जर एकाची कुणबी नोंद सापडली तर त्या भागातल्या सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा याचा अर्थ होत नसून प्रत्येकाला त्याच्या स्वतंत्रपणे कुटुंबाचा इतिहास तपासावा लागतो व त्यांच्या कुटुंबाच्या एखाद्या पिढीच्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडणे खूप गरजेचे असते व त्यासंबंधीचे कागदपत्र सादर करणे गरजेचे असते.

 जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक वंशावळ काढण्याची प्रक्रिया किंवा माहिती

जातीच्या दाखल्या करिता वंशावळ लागतेच व जेव्हा तुम्ही ही वंशावळ काढतात तेव्हा कुटुंबातील आजोबा ते पणजोबा सारख्या व्यक्तींची माहिती द्यावी लागते व त्यासोबत कागदपत्र सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. वंशावळ काढत असताना तुमच्याकडे कोणकोणत्या व्यक्तींचे कागदपत्रे आहेत त्याची सगळी आखणी आधीच करून घेणे गरजेचे असते.

वंशावळीमध्ये ज्या व्यक्तीचे कागदपत्रे तुमच्याकडे नाहीत अशा व्यक्तीचे नाव वंशावळ मधून काढून टाकणे फायद्याचे ठरते तसेच काही व्यक्तींचे कागदपत्रे व त्यांच्या वरील माहिती चुकीची असते व अशा व्यक्तीचे नाव जर तुम्ही वंशावळ मध्ये घेतले तर पुढे समस्या येऊ शकतात. अशी जर परिस्थिती आली आणि अशा व्यक्तींचे कागदपत्रे जरी तुमच्याकडे असली तरी अशा व्यक्तीच्या नावावर वंशावळमध्ये घेऊ नये. कमीत कमी व्यक्तींची नावे वंशावळीमध्ये घेणे गरजेचे असते नाहीतर कागदपत्रांची संख्या वाढते व यामुळे तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात.