खुशखबर…BMW पुढील 6 महिन्यांत घेऊन येणार 3 इलेक्ट्रिक कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- ऑडी, मर्सिडीज-बेंज, जॅग्वारनंतर आता BMW देखील भारताच्या इलेक्ट्रिक व्हेइकल मार्केमध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे. पुढील 6 महिन्यांत कंपनी आपल्या तीन इलेक्ट्रिक व्हेइकल बाजारात आणणार आहे.

कंपनी 11 डिसेंबरला BMW iX ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. भारतात लॉन्च होणारी ही कंपनीची पहिली ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल.

त्यानंतर येणाऱ्या तीन महिन्यांत कंपनी ऑल-इलेक्ट्रिक मिनी लग्जरी हॅचबॅक लॉन्च करणार आहे. त्यानंतर पुढच्या 6 महिन्यांतच ऑल-इलेक्ट्रिक सेडान बीएमडब्ल्यू आय4 कंपनीकडून लॉन्च केली जाणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया :-

BMW iX चे स्पेसिफिकेशन्स BMW iX चे वैश्विक पातळीवर दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत.

हा व्हेरियंट iX xDrive 40 आणि iX xDrive 50 आहे.

iX xDrive 40 व्हेरियंट 6.1 सेकंदमध्ये 0-100kph वेग पकडू शकतं.

तर iX xDrive 50 याहून वेगानं पुढे जाऊ शकते. हे 4.6 सेकंदांमध्ये 0-100kph च्या वेगानं पुढं जाऊ शकते.

ड्यूअल इलेक्ट्रिक मोटर :-

दोन्ही व्हेरियंटमध्ये एक ड्यूअल इलेक्ट्रिक

मोटर सेटअप देण्यात आला आहे. या कारच्या प्रत्येक एक्सेलवर एक मोटर लावण्यात आली आहे.

हे ऑल-व्हिल ड्राइव्ह कार आहेत.

याला प्युअर रियर-व्हिल-ड्राइव्ह सेटअपमध्येही चालवता येणं शक्य आहे.

बॅटरी क्षमता :-

BMW IX xDrive 50 मध्ये 105.2 kWh चा बॅटरी पॅक आहे. तर xDrive 40 मध्ये 71kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. iX xDrive 50 ची बॅटरी 35 मिनिटांमध्ये 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

BMW iX xDrive 40 ची बॅटरी 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी 31 मिनिटं लागतात.