Summer Business Idea : उन्हाळ्यात कमवायचा असेल बक्कळ पैसा तर करा ‘हा’ व्यवसाय! कमी नाही पडणार पैशांची

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Summer Business Idea :- सध्या कालावधीमध्ये नोकऱ्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग आता वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत.

तसेच व्यवसाय उभारणी करिता सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात किंवा अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते व व्यवसाय उभारणीला प्रोत्साहन दिले जात आहे.

त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून आर्थिक दृष्टिकोनातून स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न आपल्याला करताना बरेच जण दिसून येत आहेत. यामध्ये जर व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे भरपूर असे व्यवसाय आहेत.

परंतु बरेच जण कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असतात व अशा व्यवसायांची यादी देखील फार मोठी तयार होते. त्यातील नेमक्या व्यवसायाची निवड करून सुरुवात करणे खूप गरजेचे असते.

याचा अनुषंगाने तुम्ही देखील व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल व कोणता व्यवसाय सुरू करावा? याबाबत गोंधळात असाल तर या लेखामध्ये आपण नवीन एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत व तो आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायद्याचा व्यवसाय आहे.

आईस क्यूब बनवण्याचा व्यवसाय

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असून या कालावधीमध्ये भरपूर पैसा मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल तर तुम्ही आईस क्यूब बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. कारण उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये हा एक खूप फायदेशीर असा व्यवसाय आहे.

आईस क्यूब व्यवसायाच्या माध्यमातून सध्या बरेच लोक उन्हाळ्याच्या कालावधीत खूप पैसा मिळवत असून तुमच्याकरिता देखील हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

या व्यवसायाच्या सुरुवातीला काय करावे लागेल?

हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर जास्त मेहनत करण्याची गरज नाही. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या व्यवसायाची नोंदणी करणे गरजेचे. नोंदणी केल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फ्रीजर व इतर आवश्यक गोष्टींची खरेदी करणे गरजेचे आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी विजेची सोय उत्तम आहे अशा ठिकाणी हा व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरेल. साधारणपणे हा व्यवसाय तुम्हाला सुरू करण्यासाठी सुरुवातीला एक लाख रुपये खर्च येतो. एकदा का या व्यवसायाची सुरुवात झाली की तुम्हाला याचे चांगले मार्केटिंग करणे गरजेचे आहे.

महिन्याला कमवू शकतात तीस हजार

आईस क्यूब बनवण्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर चांगला चालायला लागला तर तुम्ही प्रत्येक महिन्याला तीस हजार रुपये पर्यंत देखील कमाई या माध्यमातून करू शकतात. तुमचा हा व्यवसाय वाढावा याकरिता तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल्स,

रेस्टॉरंट तसेच आईस्क्रीमची दुकाने, तुमच्या परिसरातील फळ विक्रेत्यांशी संपर्क साधून तुम्ही आईस क्यूब व्यवसायाच्या माध्यमातून बनवण्यात येणारी आईस्क्रीम देखील मोठ्या प्रमाणावर विकून व्यवसायात वाढ करू शकतात.