अरे वा ! इस्रोच भन्नाट संशोधन ; आता 10 मिनिटे आधीचं वीज कोसळण्याचा अलर्ट मिळणार, लाखों लोकांचा जीव वाचणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Isro Research : पावसाळ्यात वीज कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असते. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. अनेकदा वीज कोसळून पशुधनाची तसेच शेतकऱ्यांच्या जीवाची हानी होत असते. वीज कोसळण्याच्या सर्वाधिक घटना विदर्भात नमूद केल्या जातात.

अशा परिस्थितीत आता भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रो एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे.खरं पाहता वीज कुठे पडेल यासाठी ऑलरेडी एक तंत्रज्ञान विकसित आहे आणि ज्याचा वापर केला जात आहे.

रंतु सध्या असलेल्या तंत्रज्ञानाने चार ते पाच तास आधी वीज कोसळण्याचा एक अंदाज बांधता येतो. मात्र आता इसरो एका अशा प्रोजेक्टवर काम करत आहे ज्याच्या मदतीने दहा मिनिट अगोदर वीज कोसळण्याचा अगदी तंतोतंत असा अंदाज बांधता येणे शक्य होणार आहे.

यासाठी सॅटॅलाइट चा वापर केला जाणार आहे. या सॅटॅलाइटच्या माध्यमातून दहा मिनिट अगोदर नेमकी वीज कोसळण्याची अचूक वेळ समजण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर इसरो कडून चाचपणी सुरू असून इस्रोच्या जिओ स्टेशनरी मॅपरवर काम केले जात आहे.

याबाबत इस्रोचे वैज्ञानिक सचिव डॉक्टर शंतनू भाटवडेकर यांनी सांगितले की, वीज पडणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी अतिशय जटील स्वरूपाची आहे. अशा परिस्थितीत सध्या स्थितीला इस्रो व नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर तर्फे भारतात एकूण 25 ठिकाणी एक नेटवर्क कार्यरत आहे. या 25 ठिकाणी लाईटनिंग डिटेक्शन सेंटरचे नेटवर्क उभारण्यात आले आहे.

ज्यामध्ये एक विशिष्ट असा अल्गोरिदम वापरला जातो आणि वीज कोठे कोसळेल याचा एक अंदाज बांधला जातो. क्लाऊड टू ग्राउंड चा हा अंदाज काही तासांपूर्वी मात्र बांधला जातो. निश्चितच ही प्रक्रिया फायदेशीर आहे मात्र यामध्ये 100 किलोमीटरच्या परिघात किंवा भागाचा अंदाज हा बांधता येतो.

म्हणजेच या अल्गोरिदमचा वापर करून सध्या स्थितीला नेमकी वीज कोठे पडेल याचा अचूक असा अंदाज बांधता येत नाही आणि वेळेत हा अंदाज दिला जाऊ शकत नाही. आयआयटीएमने देशात एकूण 83 ठिकाणी यासंदर्भात यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणाच्या माध्यमातून देखील वीस ते चाळीस किलोमीटर अंतरात कुठे वीज पडू शकते याची माहिती मिळत असते.

मात्र अनेकदा या ठिकाणाहून देखील वीज कोसळण्याची नेमकी वेळ समोर येत नाही. म्हणजेच अंदाज हा तंतोतंत खरा असा ठरत नाही. काही विकसित देशात मात्र सॅटॅलाइट चा अर्थातच उपग्रहाचा वापर करून वीज कोसळण्याचा अंदाज बांधला जातो. याच धरतीवर आता आपल्या देशातही सॅटॅलाइट च्या माध्यमातून वीज कोसळण्याचा अलर्ट देण्यासाठी यंत्रणा विकसित केली जात आहे. जिओ स्टेशनरी मॅपरचा असाच हा एक उपक्रम आहे.

यासाठी जिओ स्टेशनरी सॅटॅलाइट वर विज पडण्याची सूचना देण्यासाठी काही डिटेक्टर आणि स्पेसिफिक अशी यंत्रणा उभारावी लागणार आहे. या यंत्रेनेच्या माध्यमातून ढगांवर लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. या अनुषंगाने संबंधित तंत्रज्ञानावर इसरोकडून काम सुरू असल्याचे सांगितले गेले आहे.

निश्चितच यामुळे विज कोसळण्याच्या घटनेने जी जीवितहानी होते ती होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. यामुळे इस्रोच्या या उपक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.