Farmer Success Story : जाधवरावांनी एका एकरमध्ये घेतले 12 लाख रुपयांचे उत्पन्न! मिळाले एकरी 120 क्विंटल आल्याचे उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : सध्या शेतकरी विविध पिकांची लागवड करतात व तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पादन घेतात. खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन इत्यादी बाबी अगदी वेळेवर करून भरघोस उत्पादन मिळवणे शक्य होते.

शेतीमध्ये भरघोस उत्पादन घेणे हे शेतकऱ्यांच्या हातात असते. परंतु शेतीमालाला बाजार भाव किती मिळेल हे मात्र शेतकऱ्यांच्या हातात नसते. जर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना कुणापुढे हात पसरवायची गरज भासणार नाही.

या पद्धतीचे उदाहरणे आपल्याला बऱ्याचदा दिसून येतात. मागच्या वर्षी कधी नव्हे एवढे टोमॅटोला दर मिळाले. टोमॅटोने अनेक शेतकरी कर्जमुक्त देखील केले व बरेच शेतकरी लखपती व करोडपती देखील झाले.

याच पद्धतीने यावर्षी कधी नव्हे एवढे अद्रकला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या आल्यामुळे बरेच शेतकरी लखपती झाले आहेत. अगदी याचेच उदाहरण घ्यायचे झाले तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील कौतिकराव जाधव यांचे घेता येईल.

कौतिकराव जाधव यांनी आल्याचे घेतले भरघोस उत्पादन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या करंजखेड येथील कौतिकराव जाधव हे प्रयोगशील शेतकरी असून दरवर्षी दीड एकर क्षेत्रामध्ये आल्याची लागवड हमखास करतात. त्यांना दोन मुले असून त्यांच्या मदतीने ते शेती व्यवसायाचे नियोजन करत असतात.

मागच्या वर्षी त्यांनी मे 2023 मध्ये एका एकरमध्ये 110 क्विंटल आल्याचा उतारा काढला होता व त्यावेळी त्यांनी तीस बेडवर अद्रकची ठिबकच्या माध्यमातून लागवड केली होती. या पिकाला शेणखत, रासायनिक खते, कीटकनाशके असा एकूण दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च त्यांना आला होता.

हे उत्पादन त्यांनी 11 महिन्यात मिळवले होते. त्यांच्या गावांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्रक ची लागवड केलेली होती त्यांनी साधारणपणे एकरी 110 क्विंटल उत्पादन घेतलेले होते. परंतु जाधव यांनी ते 120 क्विंटल पर्यंत नेऊन एक वेगळाच विक्रम स्थापित केलेला आहे.

यावर्षी देखील आल्या पिकाचे योग्य नियोजन करताना एका एकरामध्ये 120 क्विंटल उतारा मिळवला व यावर्षी आल्याला बाजार भाव चांगला असल्यामुळे प्रतिक्विंटल दहा हजारांचा बाजारभाव त्यांना मिळाला. म्हणजे एका एकरमध्ये त्यांना 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

विशेष म्हणजे कौतिकराव जाधव यांनी बेणे स्वरूपामध्ये आल्याची विक्री केली व त्या माध्यमातून त्यांना बारा लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच खर्च वजा जाता एका एकरमध्ये त्यांना दहा लाख रुपयांचा नफा मिळाला.

यावरून आपल्याला दिसून येते की जर जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर व्यक्ती शेती व्यवसायातून देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतो.