मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘हा’ 22 वर्ष जुना एक्सप्रेसवे होणार आठ पदरी, कोणत्या भागातील प्रवाशांना मिळणार दिलासा ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली असती. अजूनही प्राधिकरणाकडून विविध महामार्गांची कामे युद्ध पातळीवर केली जात आहेत.

प्राधिकरणाने मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम हाती घेतले असून आतापर्यंत या महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. विशेष म्हणजे 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचा उर्वरित टप्पा देखील लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार अशी अशी आहे.

याशिवाय राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे देखील काम हाती घेण्यात आले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने या महामार्गासाठीची अधिसूचना काढली आहे. यामध्ये कोणत्या गावांमधून हा महामार्ग जाणार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

अशातच मुंबई ते पुणे दरम्यानच्या एक्सप्रेस वे संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई ते पुणे दरम्यान चा 94 किलोमीटर लांबीचा महामार्ग लवकरच आठ पदरी बनवला जाणार आहे. याअंतर्गत एक्स्प्रेस वेवरील घाट विभाग वगळता संपूर्ण महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस वे सध्या सहा पदरी आहे. मात्र सध्याचा महामार्ग हा वाहनांसाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या भेडसावू लागली आहे.

या महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास खूपच जटील झाला आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघात होण्याची देखील भीती व्यक्त होत आहे.

हेच कारण आहे की राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्याचे आठ पदरीकरणं करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 94 कि.मी. लांबीच्या यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे चा ७७ किमी. लांबीच्या मार्गाचे आठ पदरीकरण केले जाणार आहे.

मुंबई-पुणे अंतर कमी करण्यासाठी एक्स्प्रेस वेच्या घाट विभागात मिसिंग लिंक प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे घाट विभागातील प्रवाशांना पर्यायी मार्गाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

दरम्यान हा मिसिंग लिंक प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला असताना या द्रुतगती मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे भविष्यात मुंबई ते पुणे हा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होईल अशी आशा व्यक्त होत आहे.