पशुपालक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जनावरांसाठी घातक अशा ‘त्या’ आजारावर महाराष्ट्रातील वैज्ञानिकांनी शोधला उपाय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. वास्तविक, पशुपालकांना गेल्या काही वर्षांपासून वाढत्या पशुखाद्यामुळे तसेच इंधनाच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असल्याने पशुपालन व्यवसाय परवडत नाहीये. अशातच गेल्या काही महिन्यांपूर्वी लंम्पि आजार आला. यामुळे आधीच वेगवेगळ्या संकटांनी बेजार झालेल्या पशुपालकांना यामुळे मोठा फटका बसला.

पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेल पशुधन या आजारामुळे मृत्यूच्या विळख्यात सापडलं. महाराष्ट्रातही आजाराचा मोठ्या प्रमाणात स्वीकार झाला. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मात्र महाराष्ट्रात या आजाराचे प्रमाण काहीसं कमी होतं. शासन आणि प्रशासन यांनी वेळेतच या आजाराबाबत योग्य त्या उपाययोजना केल्याने या आजारावर नियंत्रण मिळवता येणे शासनाला शक्य बनले.

आपल्या महाराष्ट्रासह देशातील एकूण 15 राज्यात या रोगामुळे पशुधन संकटात सापडले होते. राजस्थान सारख्या राज्यात या आजारामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन मृत्युमुखी पडले. आपल्याही राज्यात पशुधन मृत्युमुखी पडले होते. यावर शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात होत्या. निरोगी पशुधनाला काही प्रतिबंधात्मक लस देखील देण्यात आल्या. मात्र या आजारावर विशिष्ट अशी लस बाजारात नव्हती. यापूर्वी आजारासाठी विशिष्ट लस बनवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पशु पालकांना मोठी भिती होती.

या आजारामुळे अजूनही ग्रामीण भागात पशुधन बाधित होत आहे. परंतु आजाराची तीव्रता बऱ्याच अंशी कमी झाली आहे. यामुळे बाधित जनावर दगावण्याचे प्रमाणही कमी आहे. परंतु या आजारावर कायमस्वरूपी उपाय व्हावा यासाठी या आजारावर प्रभावी आणि विशिष्ट अशी प्रतिबंधात्मक लस शोधली पाहिजे अशी जाणीव वैज्ञानिकांना होती. याच पार्श्वभूमीवर वैज्ञानिकांनी या महाभयंकर आजारावर लस शोधून काढली आहे. विशेष म्हणजे याला केंद्राने मान्यता दिली आहे.भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था पुणे यांनी ही प्रतिबंधात्मक लस शोधली आहे.

यामुळे आता जो काही थोड्याफार प्रमाणात या आजाराचा धोका होता तो देखील टाळता येण्यास मदत होणार आहे. भविष्यात या लसीमुळे लंपी आजारावर प्रतिबंध घालता येणार आहे. मात्र असे असले तरी या लस विक्रीसाठी केंद्र शासनाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. पण लवकरच ही देखील परवानगी शासनाकडून मिळणार आहे.  निश्चितच या लसीमुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे भविष्यात हा आजार मोठ्या प्रमाणात पसरणार नाही आणि पशुधन सुरक्षित राहील यात तिळमात्र देखील शंका नाही.