Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील ‘या’ भागात विजांसह पावसाचा इशारा ! वाचा तुमच्या भागाविषयी काय आहे हवामान खात्याचा अंदाज ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain :- यावर्षी मान्सूनच्या पावसाने कमालीची निराशा केली असून अगदी सुरुवातीपासून पावसाने हजेरी लावतानाच ती उशिरा लावली आणि जून महिन्यामध्ये अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर मात्र जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला व खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला होता.

परंतु ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिला व खरिपाचा हंगामच धोक्यात आला. त्यात पुन्हा सप्टेंबर मध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. म्हणजेच एकंदरीत जर पाहिले तर यावर्षी खरीप हंगाम धोक्यात आलाच परंतु बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आत्तापासूनच निर्माण होऊ लागली आहे.

त्यातच आता हिवाळ्याची चाहूल लागली असून गेल्या एक ते दोन दिवसांपासून वातावरणात गारठा जाणवत आहे. तसेच काही ठिकाणी अजून देखील ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत असून पारा कमी अधिक होताना दिसून येत आहे.

म्हणजेच एकंदरीत राज्याच्या कमाल व किमान तापमानामध्ये सातत्याने चढ आणि उतार सुरूच आहे. या सगळ्या संमिश्र अशा वातावरणामध्येच महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या भागामध्ये होऊ शकतो पाऊस
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये चढ-उतार सुरू असून महाराष्ट्राच्या उत्तर भागांमध्ये बऱ्यापैकी थंडी जाणवत आहे. यामध्येच पावसाला पोषक हवामान झाल्यामुळे कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आज कोकणातील रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात विजासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि कोमोरीनच्या भागांमध्ये तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळेच महाराष्ट्रातील काही ठिकाणी ढगाळ हवामान होत असून त्यामुळे पावसाला पोषक हवामान झाले आहे.

आज म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून त्यासोबतच रत्नागिरी आणि सातारा जिल्हात देखील विजांसह पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या ठिकाणी नोंदवला गेला सर्वात निचांकी पारा
तसेच राज्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी थंडीची चाहूल लागली असून महाराष्ट्र मध्ये देखील गारठ्याचे प्रमाण कायम आहे. म्हणजे सोमवारी जळगाव जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वात निचांकी म्हणजेच 11 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील निफाड तसेच छत्रपती संभाजी नगर येथे देखील तापमानाचा पारा 14 अंशाच्या खाली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता असून राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.