ब्रेकिंग ! राज्यातील ‘या’ लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; 1 लाख 27 हजार शिधापत्रिका कायमच्या रद्दीत जमा होणार, कारण काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Ration Card News : जर तुम्हीही रेशन कार्डधारक असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आणि खास आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेला स्वस्त धान्य वितरित केले जाते. मात्र या रेशन कार्ड संदर्भात म्हणजेच शिधापत्रिका संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्रात मे 2023 अखेर 2 लाख 32 हजार 766 रेशन कार्ड बनावट असल्याचे आढळले आहे. यापैकी एक लाख 27 हजार शिधापत्रिका छाननी केल्यानंतर रद्द होणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टमध्ये पुरवठा विभागाच्या हवाल्यातुन देण्यात आली आहे.

निश्चितच ज्या लोकांनी डुप्लिकेट रेशन कार्ड बनवली आहेत अर्थातच बनावट रेशन कार्ड बनवली आहेत अशा लोकांचे धाबे यामुळे चांगलेच दणाणली आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या छाननी मध्ये जी रेशन कार्ड डुप्लिकेट असल्याचे आढळून आले आहे त्यांच्यावर एक घर एक रेशनिंग कार्ड योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून कारवाई केली जात आहे आणि अशा शिधापत्रिका कायमच्या रद्द केल्या जाणार आहेत.

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा हवामान अंदाज : राज्यात आजपासून पावसाला सुरवात होणार; किती दिवस पाऊस राहणार? वाचा…

खरंतर, रेशन कार्ड हे एका कुटुंबासाठी असते. रेशन कार्ड च्या माध्यमातून एकाच कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. यात पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना एक ठराविक शिधा ठरवून देण्यात आला आहे. तसेच अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या कुटुंबाला कितीही सदस्य असले तरी देखील 35 किलो धान्य देण्याचा निर्णय आहे.

मात्र, रेशनिंग योजनेअंतर्गत मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी एकाच कुटुंबातील अनेक लोकांनी रेशन कार्ड काढले आहे. म्हणजेच एकाच घरात एकापेक्षा अधिक रेशन कार्ड बनवण्यात आले आहेत. काही घरात तर चार-चार रेशन कार्ड तयार करण्यात आले आहेत.

जे की चुकीचे आहे. एकापेक्षा अधिक रेशन कार्ड बनवले असल्याने त्यांना अधिकच रेशन मिळत आहे. परिणामी गरजू लोक यापासून वंचित राहण्याची भीती आहे. शिवाय या योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने लाभ या लोकांकडून उचलला जात आहे. पण ही बाब केंद्र शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर अशा रेशन कार्डवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार महाराष्ट्रात ही कारवाई केली जात आहे.

5 जून 2023 पर्यंत अर्थातच गेल्या सोमवार पर्यंत महाराष्ट्रात दोन लाख 32 हजार 776 रेशन कार्ड डुप्लिकेट असल्याचे समोर आले. यानंतर या रेशन कार्डची छाननी करण्यात आली आणि छाननीअंती एक लाख 27 हजार 810 रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. एकंदरीत एकाच घरात एकापेक्षा अधिक रेशन कार्ड काढलेल्या लोकांची धाबे या निर्णयामुळे दणाणली आणली आहेत, यात शँका नाही.

हे पण वाचा :- घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सिडको ‘या’ भागात काढणार 5000 घरांसाठीची लॉटरी, वाचा….

कोणत्या जिल्ह्यात आहेत सर्वाधिक डुप्लिकेट रेशन कार्ड

नागपूर जिल्ह्यात 24 हजार 821 बनावट शिधापत्रिका आढळल्या आहेत.

खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात 9817 बनावट शिधापत्रिका आढळून आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात 8332 बनावट शिधापत्रिका आढळून आल्या आहेत.

पालघर जिल्ह्यात 8 हजार 32 बनावट शिधापत्रिका आढळून आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात 7268 अशा बनावट शिधापत्रिका आढळल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात 6525 बनावट शिधापत्रिका आढळून आल्या आहेत.

हे पण वाचा :- कापूस लागवड केलाय किंवा लागवडीच्या तयारीत असाल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला वाचाच !