मनोज जरांगे पाटील ‘या’ तारखेला घेणार जगातील सर्वात मोठी सभा, आंतरराष्ट्रीय मीडिया येणार, 900 एकरावरील सभेची गिनीज बुकमध्ये होणार नोंद !

Tejas B Shelar
Published:
Manoj Jarange Patil News

Manoj Jarange Patil News : सध्या संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय नेते निवडणुकीत प्रचारासाठी मोठमोठ्या सभा घेत आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील लवकरच जगातील सर्वात मोठ्या सभेचे आयोजन करणार आहे. या सभेचे आयोजन तब्बल 900 एकर जमिनीवर होणार असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार असल्याचा दावा आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. लोकसभा निवडणुकीची धामधूम चार जूनला संपणार आहे.

खरे तर 18 व्या लोकसभेसाठी 19 एप्रिल ला पहिल्या चरणातील मतदान होणार आहे. संपूर्ण देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून 2024 ला लागणार आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला की लगेचच मनोज जरांगे पाटील हे एका सभेचे आयोजन करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे ही सभा जागतिक लेव्हलची राहणार आहे. या सभेची दखल देश-विदेशातील लोकांना घ्यावी लागेल असे बोलले जात आहे.

ही सभा बीड जिल्ह्यातील नारायणगडावर होणार आहे. बीडपासून 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या नारायणगडावर असलेल्या मंदिर परिसरातील तब्बल 900 एकर जमिनीवर या सभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यामुळे या अनोख्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान या सभेसाठी तयारी देखील सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ही जगातील सर्वात मोठी सभा ठरणार असून या सभेला देश-विदेशातील मराठा बांधव हजेरी लावणार आहेत.

संपूर्ण जगातील मराठा समाज या दिवशी बीड जिल्ह्यातील नारायण गडावर गर्दी करेल असा दावा आयोजकांकडून होत आहे. विशेष म्हणजे देश-विदेशातील मराठा बांधवांना या सभेचे निमंत्रण देण्यासाठी ई-मेलचा आणि व्हिडिओ कॉलिंगचा वापर झालेला आहे.

ही सभा आठ जून 2024 ला आयोजित करण्यात आली असल्याची बातमी समोर आली आहे. अर्थातच मान्सून आगमनाच्या सोबतच मराठ्यांच्या भगवे वादळ देखील पाहायला मिळणार आहे. दरम्यान ही सभा एवढी भव्य राहणार आहे की याची नोंद गिनीज बुक मध्ये होईल असा दावा आयोजकांकडून होत आहे.

या सभेसाठी आंतरराष्ट्रीय मीडिया देखील उपस्थित राहू शकते असे बोलले जात आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे देखील हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या जगातील सर्वात मोठ्या सभेकडे लागलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe