मोठी बातमी ! रत्नागिरीमधून रायगड जिल्ह्यात अवघ्या दिड मिनिटात जाता येणार ; 441 कोटी रुपयांचा ‘हा’ प्रकल्प अंतिम टप्प्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Goa Expressway : मुंबई गोवा महामार्गावर तयार होणाऱ्या कशेडी बोगद्याबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. सदर बोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा बोगदा अर्थातच कशेडी बोगद्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे.

या बोगद्यामुळे कशेडी घाट मात्र पाऊण तासात पार करता येणे शक्य होणार आहे. निश्चितच घाट परिसरात होणारी वाहतूक कोंडी यामुळे निस्तारण्यास मदत होणार आहे.

एवढेच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यामधून रायगड जिल्ह्यात या बोगद्यामुळे अवघ्या दीड मिनिटात जाता येणे शक्य होणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सदर बोगद्याची एक लेन मार्च अखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुली होणार आहे. सद्यस्थितीत या बोगद्याचे 20 टक्के काम बाकी असून लवकरच हे देखील काम पूर्ण होणार आहे.

यावर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण होणार असून यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास करता येणे सोयीचे होणार आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की या बोगद्यासाठी 441 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बोगद्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तसेच चाकरमान्यांना मुंबई अधिक जवळ होणार आहे.

मित्रांनो या बोगद्याला रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणार आहे. हा बोगदा मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा राहणार आहे. सध्या या बोगद्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून मार्च अखेरपर्यंत या बोगद्याची एक लेन प्रवाशांसाठी खुली होणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार या बोगद्याच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सदर बोगद्याचे काम 2019 मध्ये सुरू झाले आहे. कशेडी घाटाला पर्याय म्हणून रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून सदर दोन बोगद्याचे काम केले जात आहे.

या दोन्ही बोगद्यांचे काम दोन्ही बाजूने पूर्ण झाले असून केवळ काही अंतर्गत कामे शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे लवकरच हा बोगदा प्रवाशांसाठी खुला होणार असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हे दोन्ही बोगदे दोन किलोमीटर लांबीचे आहेत. प्रत्येक बोगद्यात तीन लेन बनवण्यात आले आहे.

एवढेच नाही तर इमर्जन्सी मध्ये एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी सहा मार्ग तयार करण्यात आले आहेत. हा बोगदा अत्याधुनिक राहणार असून बोगद्यामध्ये वाहन बंद पडले तर पार्किंगसाठी आणि वाहने रिपेरिंग साठी सेपरेट जागा बनवण्यात आल्या आहेत. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या बोगद्यातून 80 किलोमीटर प्रतितास वाहने चालवता येणे शक्य होणार आहे.

यामुळे जो कशेडी घाट पार करण्यासाठी पावणे दोन तास लागतात तो कशेडी घाट या बोगद्याच्या माध्यमातून 45 मिनिटात पार होणारा. मित्रांनो हा बोगदा अत्याधुनिक राहणार आहे. या बोगद्यात अपघात झाल्यास तत्काळ संपर्क होण्यासाठी ‘एसओएस’ यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यात जागोजागी फायर फायटिंग यंत्रणा देखील राहणार आहे. बोगद्यात पाण्यासाठी ड्रेनेज यंत्रणा, विजेची व्यवस्था, अपघात झाल्यास चार ठिकाणी जादा स्पेस आहे.

निश्चितच हा बोगदा अत्याधुनिक असून यामुळे प्रवाशांना प्रवास करताना कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागणार नाही. निश्चितच सदर बोगदा येत्या काही दिवसात प्रवाशांसाठी खुला होणार असल्याने याचा कशेडी घाट मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.