Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : बहुचर्चित समृद्धी महामार्गाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, असा होणार फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग गेल्यावर्षी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या मार्गाचा पहिला टप्पा अर्थात नागपूर ते शिर्डी सद्यस्थितीला खुला झाला असून चालू वर्षाच्या डिसेंबर अखेर या मार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते मुंबई सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दरम्यान आता समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं पाहता, समृद्धी महामार्गासाठी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून 15 वाहनांची मागणी करण्यात आली होती. आता ही वाहने वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे.

यामुळे समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होणार आहे. वास्तविक वाहतुकीचे नियम मोडून बेशिस्त पद्धतीने वाहतूक करणाऱ्या आणि आपला व इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहनचालकांना अटकावं घालण्यासाठी राज्यातील वाहतूक पोलिसांना 194 इंटरसेप्टर वाहनांची आवश्यकता आहे. यासाठीचा प्रस्ताव देखील राज्य शासनाकडे पडून आहे. ही मागणी केलेली वाहने वाहतूक पोलिसांना देण्यात आली तर बेसिस्त वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना यश मिळणार आहे.

सद्यस्थितीला कमी वाहनांचा उपयोग करूनच वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करावी लागत आहे. यामुळे वाहतूक पोलीस या वाहनांची वाट पाहत आहेत. वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात आणि यामुळे आपला व इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात घालतात. अनेक वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालवतात. परिणामी मोठमोठे अपघात होतात. त्यामुळे अशा बेसिस्त वाहन चालकांवर कारवाई करणे आवश्यक असते.

दरम्यान या अशा वाहतुकीचे नियम पायामल्ली तुडवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी इंटरसेप्टर वाहने वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिले आहेत. राज्यातील अनेक शहरांमधील पोलिसांना ही वाहने देण्यात आली आहेत. याशिवाय महामार्ग वाहतूक पोलिसांकडे देखील अशी वाहने आहेत. सध्या स्थितीला महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांकडे एकूण 96 इंटरसेप्टर वाहने आहेत. यापैकी 62 इंटरसेप्टर वाहने ही महामार्ग पोलिसांकडे आहेत. आणखी 192 इंटरसेप्टर वाहने वाहतूक पोलिसांना आवश्यक असून यासंबंधी प्रस्ताव राज्य शासनाकडे कोरोना काळापासून विचाराधीन आहेत.

मात्र यावर राज्य शासनाकडून विचारविनिमय झाला नसल्याने वाहतूक पोलिसांना कमी वाहनातच आपल कर्तव्य बजवावे लागत आहे. अशातच राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा मुंबई नागपूर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे अर्थातच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गसाठी 8 इंटरसेप्टर वाहने उपलब्ध आहेत. मात्र, या इतक्या वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करता येणे अशक्य आहे. यामुळे 15 अजून इंटरसेप्टर वाहने वाहतूक पोलिसांना आवश्यक आहेत.

ही वाहने आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने देऊ करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला समृद्धी महामार्गावर वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद पुणे नागपूर विभागातील वाहतूक पोलिसांना जबाबदारी देण्यात आली आहे. या संबंधित विभागातील वाहतूक पोलीस लेझर स्पीड गन, अल्कोहोल ब्रेथ अॅनलायझर यासह अन्य यंत्रणा असलेल्या आठ इंटरसेप्टर वाहनांचा उपयोग करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत आहे.

मात्र आता लवकरच 15 नवीन इंटरसेप्टर वाहने या पोलिसांना उपलब्ध होतील आणि त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यास पोलिसांना यश मिळेल असा आशावाद आता व्यक्त केला जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या इंटरसेप्टर वाहनांमध्ये स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. त्यामुळे ऊन-वारा, पावसाचा परिणाम पोलिसांच्या स्पीडगन कारवाईवर होत नाही. याशिवाय कारवाईसाठी सीसी टीव्ही कॅमेरे, ब्रीद अॅनलायझर, इ-चलान यंत्रणाही यामध्ये आहे. निश्चितच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसह्य असलेल्या या इंटरसेप्टर वाहनांचा समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे.