पंजाब डख यांचा मान्सूनपूर्व हवामान अंदाज; अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात ‘या’ तारखेला पडणार मान्सूनपूर्व पाऊस, मान्सूनच आगमनही लवकरच, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh Monsoon 2023 Andaj : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी काल म्हणजे 13 मे 2023 रोजी मान्सूनपूर्व हवामान अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी राज्यात 20 मे 2023 पर्यंत हवामान कोरड राहणार असल्याचे सांगितले आहे.

परंतु आज अर्थातच 14 मे रोजी अहंमदनगर जिल्ह्यासह राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे. यामध्ये कोकणात देखील ढगाळ हवामान राहील. यावेळी मात्र पाऊस पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याउलट तापमानात वाढ राहणार असल्याने उकाडा जाणवणार आहे.

हे पण वाचा :- रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा सविस्तर

मात्र 20 मे नंतर राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 21 मे पासून ते 23 मे पर्यंत राज्यातील अहमदनगर जिल्ह्यासह बहुतांशी जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे. हा पाऊस मात्र भाग बदलत पडेल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे.

तसेच, यावर्षी मान्सूनचे आगमन लवकरच होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. खरं पाहता दरवर्षी मान्सून महाराष्ट्रात सात जूनच्या सुमारास दाखल होतो. डख यांनी देखील गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात मान्सूनचे आगमन आठ जूनला होणार असं नमूद केलं होतं. मात्र सध्या हवामानात होत असलेल्या बदलामुळे आणि चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनचे आगमन वेळेआधी होणार आहे.

हे पण वाचा :- 12वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी ! BSF मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, 21 मे पर्यंत इथं करा अर्ज

केव्हा होणार यंदा मान्सूनच आगमन?

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मे पर्यंत मान्सून अंदमानपर्यंत पोहचणार आहे. आणि त्याचवेळी चक्रीवादळाची देखील शक्यता आहे. यामुळे 30 मे नंतर राज्यातील हवामानात मोठा बदल होणार असून एक जून रोजीच मान्सूनचे आगमन राज्यात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

एवढेच नाही तर 1 जून पासून ते 3 जून पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. यावेळी मान्सूनचा पाऊस पडणार आहे. हा पाऊस मान्सून पूर्व राहणार नसून मान्सूनचा पाऊस राहणार असल्याने मान्सूनचे आगमन यंदा एक जूनलाच होणार असल्याचा दावा डख यांनी केला आहे.

दरम्यान 1 जून, 2 जून आणि 3 जून ला राज्यातील कोणत्या भागात मान्सूनचे आगमन होईल? कोणत्या जिल्ह्यात यावेळी पाऊस पडेल? याबाबत अद्याप पंजाब डख यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच याबाबत सविस्तर असा हवामान अंदाज डख सार्वजनिक करणार आहेत. 

हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! ‘या’ भागात पुन्हा वादळी पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा