पुण्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी मिळणार नुकसान भरपाई, पशुसंवर्धन विभागाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Jilha Lumpy Skin Nuksan Bharpai : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. पशुखाद्याच्या वाढत्या किमती, इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाढती महागाई पाहता पशुपालन हा व्यवसाय पशुपालक शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सिद्ध होऊ लागला आहे. अशातच गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लंपी चर्मरोग आजाराचा शिरकाव झाला.

आधीच वेगवेगळ्या संकटांमुळे बेजार झालेल्या पशुपालकांच्या पुढ्यात हे एक मोठं संकट येऊन ठेपले. या आजारामुळे सर्वाधिक नुकसान राजस्थान राज्यात पाहायला मिळाले. महाराष्ट्रात देखील या आजाराच्या प्रादुर्भावाने लाखो पशुधन संकटात आले. या आजारामुळे हजारोच्या संख्येने पशुधन मृत्युमुखी देखील पडले. अशा परिस्थितीत राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना मोठा फटका यामुळे बसला.

हे पण वाचा :- धक्कादायक! संपात सामील झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय, ‘हे’ परिपत्रक झाले निर्गमित

यामुळे राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव मदतीची आशा होती. त्यादृष्टीने शासनाकडून प्रयत्न देखील झालेत. या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात पशुपालक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची घोषणा शासनाकडून करण्यात आली.

मोठ्या जनावरांना प्रति जनावर तीस हजार रुपये आणि लहान जनावरांना प्रतिजनावर 16 हजार रुपये अशी नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत सातशे पशुपालक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1,226 पशुधन लंपी आजारामुळे मृत्युमुखी पडले आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता राज्यात सफरचंद लागवड होणार शक्य; शास्त्रज्ञांनी केली ही कामगिरी

त्यामध्ये ६८२ गाई, १६१ बैल आणि १६३ वासरांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत अजूनही जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना या मदतीची प्रतीक्षाच आहे. दरम्यान आता या नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या पशुपालकांना लवकरच नुकसान भरपाईची रक्कम वर्ग केली जाणार आहे.

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार लवकरच लंपी आजाराने मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात संबंधित पशुपालक शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना देखील याचा लाभ होणार आहे.

हे पण वाचा :- Cibil Score खराब आहे का? चिंता नको, ‘या’ पद्धतीने सिबिल स्कोर खराब असतानाही कर्ज मिळणार, पहा….