घरामध्ये ‘या’ दिशेला ठेवाल सोने-चांदीचे दागिने तर होईल आर्थिक नुकसान; कोणत्या दिशेला ठेवावेत सोन्या-चांदीचे दागिने?

Ajay Patil
Published:

भारतीय परंपरेमध्ये ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्र,अंकशास्त्र यांना जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे वास्तुशास्त्राला देखील आहे. आपल्याला माहित आहे की नवीन घर बांधायला जेव्हा घेतले जाते तेव्हा घर वास्तुशास्त्रानुसार बांधले जावे असा आग्रह प्रत्येकाचा असतो.

तसेच घरातील स्वयंपाक घरापासून तर बाथरूम पर्यंतच्या सगळ्या गोष्टी कोणत्या दिशेला असाव्यात हे देखील वास्तुशास्त्रामध्ये नमूद केलेले आहे व यानुसारच घराची रचना केली जाते. या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला वास्तुशास्त्राचे भारतीय परंपरेतील महत्त्व विशद होते.

अगदी याच पद्धतीने जर आपण सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा विचार केला तर वास्तुशास्त्रानुसार ते घरात कोणत्या ठिकाणी ठेवावेत याबाबत देखील काही नियम आहेत.

जर असे सोन्या चांदीचे दागिने घरात चुकीच्या दिशेला ठेवले गेले तर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सोने चांदीचे दागिने कोणत्या दिशेला ठेवावे किंवा कुठे ठेवावेत? याबद्दल महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

 घरामध्ये सोनेचांदीचे दागिने ठेवण्याची योग्य दिशा कोणती?

वास्तुशास्त्रानुसार बघितले तर चुकून देखील घरातील सोना चांदीचे दागिने दक्षिण दिशेला ठेवू नये. कारण या दिशेला वास्तुशास्त्रात यमराजची दिशा म्हटले जाते. दक्षिण दिशेला सोने चांदीचे दागिने ठेवले तर घरामध्ये निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता येण्याची शक्यता असते व धनलाभ तर होतच नाही.परंतु आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. याशिवाय..

 तुटलेला बॉक्स किंवा पेटी

घरामध्ये जर तुटलेला बॉक्स किंवा पेटी असेल तर त्या बॉक्स किंवा पेटीचा वापर दागिने ठेवण्यासाठी करू नये. याकरिता चांगली पेटीचा वापर करावा व ज्या ठिकाणी तुम्ही दागिने ठेवणार आहात ती जागा स्वच्छ असते हे देखील तितकेच गरजेचे आहे.

 पूजा घरात किंवा देवघरात दागिने ठेवू नका

बरेच जण हे पूजा घरात दागिने ठेवतात. पण यासंबंधी जर आपण वास्तुशास्त्रानुसार माहिती घेतली तर प्रकारे पूजा घरामध्ये दागिने ठेवणे हे योग्य नाही. तुम्ही देखील पूजा घरामध्ये दागिने ठेवत असाल तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार पूजा घरात दागिने ठेवू नका.

 घरामध्ये कोणत्या ठिकाणी सोनेचांदीचे दागिने ठेवावेत?

तुम्ही जर घरामध्ये उत्तर पश्चिम दिशेला दागिने ठेवत असाल तर ते वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते. कारण ही दिशा माता लक्ष्मीची दिशा म्हणून ओळखली जाते.

तुम्ही जर उत्तर पश्चिम दिशेला सोन्याचे दागिने किंवा पैसे ठेवत असाल तर घरामध्ये सुख समृद्धी नांदते व सकारात्मक वातावरण राहते. तुम्ही घराच्या उत्तर पश्चिम दिशेला ठेवलेल्या ज्या काही वस्तू असतात त्या तुम्हाला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी देखील मदत करतात.

( टीप वरील मजकूर वाचकांच्या माहितीस्तव सादर करण्यात आलेला आहे व या माहितीचे आम्ही कुठल्याही प्रकारचे समर्थन किंवा दावा करत नाहीत.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe