गुंतवणूकदारांना करोडपती बनवल्यानंतर आता ‘कंगाल’ करतोय हा शेअर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Share Market  :- वाचकहो शेअर बाजार समजून घेणे थोडे कठीण आहे. पण हे ज्याला समजले, ते काही दिवसांत काहीतरी वेगळे करणार हेही निश्चित. तुमची तिजोरी कोणता शेअर कधी भरेल, हे सांगणे कठीण आहे.

2021 मध्ये अनेक स्टॉक्स आणि पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना भरभरून रिटर्न्स दिले. पण काही शेअर्स असे आहेत की, ज्यांनी गती कायम ठेवली नाही आणि आता त्यामुळे गुंतवणूकदारांचे खिसे रिकामे होऊ लागले आहेत.

एकेकाळी या शेअरचा 3,356 रुपयांचा उच्चांक –
आज आम्ही राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या नझारा टेक्नॉलॉजीजच्या (nazara technologies share) शेअरबद्दल बोलत आहोत.

1730 वर उघडलेला शेअर तेजीत राहिला. एकेकाळी 3,356 रुपयांचा उच्चांक गाठलेल्या या शेअरमध्ये अल्पावधीतच मोठी घसरण पाहायला मिळाली.

१ लाखचे 52 हजार झाले आहेत –
त्याच्या उच्च पातळीपासून हा स्टॉक सुमारे 48 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने हा स्टॉक 52 आठवड्यांच्या वर खरेदी केला असेल, तर आज त्याचे पैसे जवळपास निम्मे झाले आहेत.

Nazara Technologies चा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,356 रुपये आहे. त्यावेळी कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर आता ही रक्कम ५२ हजारांवर आली आहे.

दीड महिन्यात 35 टक्के घसरण झाली –
21 जानेवारीपासून सुमारे दीड महिन्यात हा शेअर 35 टक्क्यांनी घसरला आहे. बिगबुल राकेश झुनझुनवाला यांनीही या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘

अनेक गुंतवणूकदारांना बिगबुल होल्डिंगचा हा स्टॉक विकावा की, अजून वाट पहावी की नाही अशी भीती सतावत आहे. हा शेअर 1500 ते 1600 रुपयांच्या श्रेणीत खरेदी करणे योग्य ठरेल, असे मत बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

1,990 रुपये ते 3,356 रुपयांपर्यंत प्रवास 
30 मार्च 2021 रोजी NSE वर Nazara Technologies चा इश्यू 1,990 रुपयांना सूचीबद्ध झाला. ज्या दिवशी तो लिस्ट झाला त्या दिवशी शेअर 1,552 रुपयांपर्यंत घसरला.

त्यानंतर 15 सप्टेंबर 2021 पर्यंत हा स्टॉक 1,980 रुपयांवरून 1450 रुपयांपर्यंत घसरला. नंतर हा स्टॉक त्याच्या इश्यू किमतीतून बाहेर आला आणि त्याने 3,356 रुपयांचा उच्चांक गाठला. आता पुन्हा हा शेअर घसरत आहे आणि सध्या रु.1700 ते 1800 च्या दरम्यान व्यवहार करत आहे.

31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे या कंपनीत 10.10 टक्के शेअर्स आहेत.