Automatic Washing Machine: ‘हे’ ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 70 टक्के करते विजेत बचत व 50 टक्के वेगात धुते कपडे! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Automatic Washing Machine :- जर आपण विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक उपकरणांच्या बाबतीत पाहिले तर सॅमसंग ही कंपनी गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय बाजारपेठेतील एक ग्राहकांमधील विश्वासाचे आणि प्रसिद्ध असे नाव आहे.

सॅमसंग कंपनी टीव्ही तसेच फ्रीज व मोबाईल पासून ते वाशिंग मशीनपर्यंत अनेक घरगुती वापरासाठी महत्त्वाचे असलेले उत्पादने तयार करते. सॅमसंग म्हटले म्हणजे ग्राहक कुठल्याही प्रकारचा विचार न करता हव्या त्या किमतीमध्ये या कंपनीचे उपकरणे घ्यायला तयार असतात.

अशाप्रकारे सॅमसंग या कंपनीने एक एआय इकोबबल टीएम स्वयंचलित फ्रंट लोड नवीन वाशिंग मशीन लॉन्च केलेले असून यामध्ये अनेक प्रकारचे उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे हे वॉशिंग मशीन कपडे धुण्याचे काम इतर वॉशिंग मशीन पेक्षा 50 टक्के वेगाने करते व एवढेच नाही तर वीज वापरामध्ये 70% पर्यंत बचत करते.

काय आहेत या वाशिंग मशीनची वैशिष्ट्ये?

सॅमसंग कंपनीचे हे वाशिंग मशीन एआय इकोबबल तंत्रज्ञानाने सुसज्ज असून या तंत्रज्ञानामुळे वेगात डिटर्जंट समाविष्ट करून घेण्याची क्षमता आहे. तसेच यामध्ये अतिरिक्त वॉटर शॉटसोबत डायनॅमिक ड्रम रोटेशन समाविष्ट करण्यात आलेले आहे.

या वाशिंग मशीनमध्ये असलेले क्विक ड्राईव्ह टीएम वेगात कपडे धुण्यासाठी लागणारा वेळ पन्नास टक्क्यांनी कमी करते. त्यामुळे लागणारे पाणी व विजेचे देखील बचत होते. तसेच एआय वाश वैशिष्ट्ये त्यांचा भार किती आहे हे ओळखते व त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे पाणी व डिटर्जंटचा वापर करते.

तसेच कपड्यांचा प्रकार म्हणजेच कपड्यांची वैशिष्ट्य ओळखून त्याप्रमाणे वॉश आणि स्पिनची वेळ देखील ठरवते. या वॉशिंग मशीनचे वजन फक्त अकरा किलो असल्यामुळे तुम्ही कोणत्याही जागेत सहजपणे त्याला ठेवू शकतात. या मध्ये वापरण्यात आलेल्या मॉडेल क्विक ड्राईव्ह टीएम तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या 39 मिनिटांमध्ये स्वच्छ कपडे धुवून आपल्याला मिळतात.

एवढेच नाही तर हे वाशिंग मशीन वायफाय टेक्नॉलॉजी सह उपलब्ध झाले असून यामुळे स्मार्ट थिंगच्या माध्यमातून कधीपण व कुठेही या मशीनवर देखरेख ठेवण्याचे सुविधा ग्राहकांना या माध्यमातून मिळते. यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे ही आऊटो सायकल लिंक फक्त तेव्हाच मिळते जेव्हा वॉशर आणि ड्रायर दोन्ही एआय कंट्रोल आणि वायफाय या सुविधाद्वारे जोडलेले असतात.

या वॉशिंग मशीनला कंट्रोल पॅनल सोबत आधुनिक डिझाईन असणार आहे व ते काळ्या रंगात ग्राहकांसाठी बाजारपेठेत उपलब्ध असणार आहे. तसेच हे वॉशिंग मशीन सॅमसंग कंपनीचे अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर व त्यासोबत रिटेल स्टोअर्स आणि इतरही कॉमर्स प्लॅटफॉर्म वर विक्रीकरिता उपलब्ध असणार आहे.

किती आहे या वॉशिंग मशीनची किंमत?

या वॉशिंग मशीनची सुरुवातीची किंमत 67990 पासून सुरू होऊन 71 हजार 990 रुपयापर्यंत असणार आहे व यासोबत कंपनीने वीस वर्षाची वॉरंटी देखील दिलेली आहे. सध्या हे वाशिंग मशीन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.