रस्त्यावर का असतात पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा? काय होतो त्यांचा अर्थ? वाचा महत्वाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रस्त्यावर वाहन चालवत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या वाहतुकीचे नियम पाळणे खूप गरजेचे असते. असे नियम पाळणे हे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या जिवीताच्या रक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहे. परंतु बऱ्याचदा अनेक वाहन चालक हे नियम पाळत नाहीत व त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळते व अपघात घडतात. जेव्हा आपण रस्त्यावरून जात असतो तेव्हा आपल्याला अनेक मार्किंग असलेले बोर्ड पाहायला मिळतात.

या प्रकारच्या वेगवेगळ्या मार्किंगचा अर्थ हा वाहतूक नियमांच्या संबंधित असतो व आपल्याला त्या मार्किंगचा अर्थ माहित असणे खूप गरजेचे असते. या शिवाय रस्त्यावर आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पिवळ्या, पांढऱ्या रंगाच्या रेषा रस्त्यावर मारलेल्या दिसतात किंवा काही ठिकाणी तुटक असलेल्या रेषा असतात. या रेषांचा अर्थ देखील वाहतुकीच्या संबंधितच असतो व तो देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे असते. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण या रेषांचा अर्थ नेमका काय असतो हे आपण पाहणार आहोत.

 रस्त्याच्या मधोमध असलेल्या तुटक रेषांचा अर्थ काय असतो?

आपण प्रवास करत असताना रस्त्याच्या अगदी मध्यभागी काही मीटर अंतरावर आपल्याला तुटक पांढऱ्या रेषा दिसतात. रेषांचा अर्थ होतो की तुम्ही रस्त्यावर गाडी चालवत असताना यु टर्न घेऊ शकता किंवा लेन बदलू शकता. परंतु असे करत असताना किंवा लेन बदल करत असताना गाडी सांभाळून चालवणे हे देखील खूप महत्त्वाचे असते.

 रस्त्यावर असणाऱ्या सरळ पांढऱ्या रेषांचा अर्थ काय होतो?

रस्त्यावरून प्रवास करत असताना आपल्याला बऱ्याचदा पूर्ण पांढऱ्या रेषा दिसतात व या पद्धतीच्या रेषा रस्त्याच्या मध्यभागी असतात. या सरळ पांढऱ्या रेषांचा अर्थ होतो की रस्त्यावर कोणत्याही दिशेने वाहन चालवत असताना आपण यू टर्न घेऊ शकत नाहीत आणि ओव्हरटेक देखील करू शकत नाही. समजा तुम्ही अशी सरळ पांढरी रेष क्रॉस करताना जर तुम्हाला एखाद्या  वाहतूक पोलिसांनी पकडले तर ते तुमच्याकडून दंड वसूल करू शकतात.

 रस्त्यांच्या मध्ये असलेल्या दोन पांढऱ्या रेषांचा अर्थ काय होतो?

बऱ्याचदा रस्त्याच्या मधोमध दोन पांढऱ्या रेषा आपल्याला दिसतात व त्यांचा अर्थ होतो की तुम्ही त्या ठिकाणी ओव्हरटेक करू शकत नाही. त्यावरून जात असताना ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या दोन पांढऱ्या रंगाच्या रेषा एकत्र दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला एकाच लाईनने गाडी चालवावी लागते. अशा ठिकाणी तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही.

 रस्त्यावरील पिवळ्या रेषांचा अर्थ काय होतो?

बऱ्याचदा रस्त्यावर तुम्हाला पांढऱ्या रेषांऐवजी पिवळ्या रंगाची सिंगल लाईन दिसते. या ठिकाणी तुम्ही अशी पिवळी रेषा ओलांडू शकत नाही व तुम्ही तुमच्या स्वतःच्या रांगेत राहून वाहने पास करू शकतात आणि ओव्हरटेक देखील करू शकता परंतु क्रॉस करू शकत नाही.

 दोन पिवळ्या रेषांचा अर्थ काय होतो?

प्रवास करत असताना आपल्याला रस्त्यावर दोन पिवळ्या रेषा दिसतात. या ठिकाणी तुम्ही वाहन ओव्हरटेक करू शकत नाही किंवा  रस्त्याच्या कडेच्या बाजूने जर पिवळी रेषा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे वाहन उभे करू शकत नाही किंवा पार्क करू शकत नाही.