5Kw Solar System : ‘या’ ठिकाणी बसवता येईल तुम्हाला बॅटरीशिवाय 5Kw सोलर सिस्टम! वाचा किती लागेल पैसा?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5Kw Solar System :- सध्या सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वित असून या माध्यमातून अनुदान स्वरूपात सोलर सिस्टम बसवण्याकरिता आर्थिक मदत करण्यात येत आहे.

ऑफ ग्रिड सोलर सिस्टम बसवायचे असेल तर केंद्र सरकारकडून देखील प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये तीन किलो वॅट क्षमतेच्या सोलर सिस्टम करिता 40% आणि तीन किलोवॉट पासून ते दहा किलो वॅट क्षमतेच्या सोलर सिस्टम करिता 20% अनुदान ग्राहकांना मिळते.

विजेचा वापर या दृष्टिकोनातून बघितले तर बहुतेक कार्यालयांमध्ये फक्त दिवसाच विजेची आवश्यकता असते. त्यामुळे अशा ठिकाणी जर सोलर सिस्टम बसवायची असेल तर ती बॅटरी शिवाय चालणारी सोलर सिस्टम बसवता येणे शक्य आहे व अशा प्रकारच्या सौर सिस्टमलाच ऑन ग्रीड सिस्टम म्हणतात.

अशा आस्थापनांमध्ये जास्त विजेचा भार घेणाऱ्या उपकरणांचा वापर केला जात असेल तर बॅटरी शिवाय पाच किलो बॅटरी सोलर सिस्टम बसवता येते. या सोलर सिस्टमच्या मदतीने आवश्यक त्या प्रमाणात वीज निर्मिती होऊन जास्त भार घेणारी उपकरणे देखील चालवता येतात.

हवामान चांगले असेल तेव्हा पाच किलो वॅट क्षमतेचे सोलर सिस्टम प्रत्येक दिवसाला 25 मिनिट पर्यंत विजेची निर्मिती करू शकते. ऑन ग्रिड सोलर सिस्टमच्या माध्यमातून तयार होणारी वीज इलेक्ट्रिक ग्रीड सोबत विभागली जाते.

ज्या ठिकाणी वीज वारंवार खंडित होत नाही अशा ठिकाणी ऑन ग्रीड सोलर सिस्टम बसवणे फायद्याचे ठरते. यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे ऑन ग्रिड सोलर सिस्टममध्ये पावर बॅकअप घेता येत नाही त्यामुळे अशा सोलर सिस्टममध्ये बॅटरीचा वापर होत नाही.

किती आहे बॅटरी शिवाय असलेल्या पाच किलो वॅट सोलर सिस्टमची किंमत?

जर या पाच किलोवॅट सोलर सिस्टममध्ये योग्य रेटिंगची उपकरणे वापरली तर महत्त्वाचे ठरते. त्यामुळे योग्य रेटिंगची उपकरणे वापरून या प्रकारची सोलर सिस्टम बसवणे योग्य आहे. सोलर पॅनल, सोलर इन्वर्टर, सोलर चार्ज कंट्रोलर आणि नेट मीटर इत्यादी उपकरणांचा वापर या ऑन ग्रिड सोलर सिस्टममध्ये केला जातो.

या ऑन ग्रिड सोलर सिस्टमच्या माध्यमातून मिळणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्राहकांना इलेक्ट्रिक ग्रीड वीजबिलामध्ये सूट मिळते. तुम्हाला जर पाच किलोवॅट क्षमतेची ऑन ग्रीड सोलर सिस्टम बसवायची असेल तर तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो.

यामध्ये सौर पॅनल हे सर्वात महत्त्वाचे उपकरण असून या पॅनलच्या माध्यमातूनच सूर्यापासून मिळालेल्या ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतरण केले जाते. सौर पॅनल दोन प्रकारचे येतात व यामध्ये पॉलीक्रिस्टलाईन आणि मोनोक्रिस्टलाईन या प्रकारांचा समावेश होतो. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार यापैकी निवड करू शकता.

जर आपण सौर पॅनल ची सरासरी किंमत पाहिली तर पाच किलो वॅट क्षमतेच्या पॉलीक्रिस्टलाईन सौर पॅनल ची किंमत साधारणपणे एक लाख 50 हजार रुपये असू शकते. या प्रकारचा सौर पॅनल खराब हवामानात किंवा कमी सूर्यप्रकाशामध्ये वीज तयार करू शकत नाही यांना इन्स्टॉल करण्यासाठी जागा देखील जास्त लागते.

परंतु त्या तुलनेत पाच किलो वॅट क्षमतेच्या मोनोक्रिस्टलाईन सौर पॅनलची किंमत पाहिली तर ती एक लाख 75 हजार रुपये पर्यंत आहे. हे सौर पॅनल उच्च कार्यक्षमतेचे असतात व त्यांचा वापर कमी सूर्यप्रकाशात जास्त वीज निर्मितीसाठी करता येऊ शकतो.

अशा सोलर सिस्टममध्ये वापरता येणारी इन्व्हर्टर व त्याची किंमत

ग्रीड टाय सोलर इन्वर्टर पाच किलो वॅट ऑन ग्रीड सोलर सिस्टममध्ये वापरतात. यामध्ये तुमच्या गरजेनुसार व आर्थिक बजेटनुसार तुम्ही सोलर इन्वर्टरची निवड करू शकता. या सोलर सिस्टममध्ये वापरल्या जाणाऱ्या सोलर इन्वर्टरच्या माध्यमातून पाच किलो वॅट पर्यंतचे लोड अगदी सहजपणे चालवता येतात.

तुम्ही तुमच्या घरी बसवलेल्या सोलर सिस्टममध्ये बाजारात उपलब्ध असलेला ग्रीड इन्वर्टरवर लुमिनस पाच किलो वॅट सिंगल फेज सोलर वापरू शकता. या सोलर इन्व्हर्टरची किंमत अंदाजे 45 हजार रुपये आहे. तसेच तुम्ही इतर ब्रँडचे पाच किलो वॅट क्षमतेचे सोलर इन्वर्टर देखील खरेदी करू शकतात व त्यांची किंमत पन्नास हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

बॅटरी शिवाय पाच किलोवॅट क्षमतेच्या सोलर सिस्टमची एकूण किंमत

तर आपण बॅटरी शिवाय असलेल्या पाच किलो वॅट सोलर सिस्टमचे एकूण किंमत पहिली तर यामध्ये नेट मीटर, वायरिंग तसेच लाइटिंग अरेस्टर आणि अर्थिंग इत्यादी सारख्या उपकरणांचा देखील खर्च होतो.

पॉलीक्रिस्टलाईन सोलर पॅनल वापरले तर

पाच किलोवॅट पॉलीक्रिस्टलाईन सोलर पॅनलची किंमत दीड लाख रुपये, सोलर इन्वर्टरची किंमत 40000 व अतिरिक्त खर्च 30 हजार असे एकूण दोन लाख वीस हजार रुपये खर्च येतो.

मोनोक्रिस्टलाईन सोलर पॅनल वापरले तर

यामध्ये पाच किलो वॅट मोनोक्रीस्टलाईन सोलर पॅनलची किंमत एक लाख 75 हजार, सोलर इन्वर्टरची किंमत 50000 व इतर खर्च 30000 असे एकूण दोन लाख 55 हजार खर्च येऊ शकतो.