Team India : वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा प्लॅन बदलला ! BCCI ने अचानक केला ‘हा’ मोठा बदल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Team India : भारतीय क्रिकेट संघ सध्या या वर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. यामुळे या वर्षात भारतीय संघ सतत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या  31 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो आयपीएलनंतर पुन्हा एकदा भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जूनमध्ये भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे तर त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आशिया कप खेळताना भारतीय संघ दिसणार आहे मात्र आम्ही तुम्हाला सांगतो आता बीसीसीआयने संघाच्या प्लॅनमध्ये थोडा बदल केला आहे.

आयपीएल संपल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, परंतु त्याआधी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या या दौऱ्यात थोडा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाला या दौऱ्यात 2 कसोटी सामने, 3 T20 सामने आणि 3 ODI सामने खेळायचे होते पण आता त्यात बदल झाला आहे. आता हा दौरा 10 सामन्यांचा झाला आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या 3 टी-20 सामन्यांऐवजी आता एकूण 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे. याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

संघ आयर्लंड दौऱ्यावरही जाणार  

भारताचा वेस्ट इंडिज दौरा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे, तर येत्या काही दिवसांत या दौऱ्यावर कोणता सामना होणार याची संपूर्ण माहिती समोर येणार आहे. 10 सामन्यांचा दौरा संपल्यानंतर, संघ तीन T20 खेळण्यासाठी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आयर्लंडला जाईल. खुद्द क्रिकेट आयर्लंडनेच ही माहिती दिली.

बीसीसीआय ही विशेष तयारी करत आहे

वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआय रोहित शर्मा आणि कंपनीसाठी मायदेशात एक छोटी द्विपक्षीय मालिका आयोजित करण्याची योजना आखत आहे. क्रिकबझने अहवाल दिला की शक्य असल्यास, लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर जून 2023 च्या उरलेल्या दिवसांत श्रीलंका किंवा अफगाणिस्तानसोबत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जाऊ शकते.

हे पण वाचा :-  New Rules: सरकारची मोठी घोषणा ! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ नियम ; जाणून घ्या सविस्तर