वर्ल्डकपमध्ये ट्विस्ट ! सेमीफायनलसाठी दोन टीम कंफर्म, पाकिस्तान न्यूझीलंडची काय आहे स्थिती? पहा वर्ल्डकपच गणित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

World Cup : सध्या वर्ल्डकपचा मोठा थरार सुरु आहे. भारताचा विजयाचा रथ अजूनतरी कुठेही थांबलेला नाही. सेमीफायनलला कोण असेल याच्या अटकली बांधले जात असताना आता यात ट्विस्ट आला आहे.

शनिवारी झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. यामुळे आता सेमीफायनलच्या समीकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. टीम इंडियाशी न्यूझीलंडची स्पर्धा होईल असे म्हटले जात असताना आता

न्यूझीलंड संघाने सलग चार सामने गमावले आहेत. तर सुरवातीसच सलग चार सामने गमावल्यानंतर आता मात्र पाकिस्तानने अंतिम-४ च्या तिकिटावर आपला दावा मजबूत केला आहे.

सेमीफायनलमध्ये दोन स्थानांसाठी चार संघांची लढत

एवढेच नव्हे तर या सामन्यात पाकिस्तानच्या विजयासह दोन्ही संघांच्या उपांत्य फेरीचे तिकीट पक्के झाले आहे. भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. पाकिस्तानच्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला आणि टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघानेही उपांत्य फेरी गाठली.

आता शेवटच्या दोन स्थानांसाठी पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत आहे. यातील दोन संघ उपांत्य फेरीत जातील तर दोन संघ शर्यतीतून बाहेर पडतील.

कशी बनतायेत समीकरणे ?

आता समीकरणांबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानला शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध आणि न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. दोघांनीही आपापले सामने जिंकले तर नेट रनरेट येईल. ऑस्ट्रेलिया ही इंग्लंड आणि अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यास तो

ऑस्ट्रेलियासाठी धोका आणि अफगाणिस्तानसाठी चांगला मार्ग ठरेल. अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुढील दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तर तोही शर्यतीत कायम राहील.

न्यूझीलंड आणि पाकिस्तानला किती संधी

पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी कसल्याही परिस्थितीत आपले शेवटचे सामने जिंकणे महत्वाचे आहे. यानंतर नेट रनरेट लागू होईल. अफगाणिस्तानच्या पराभवासाठीही या दोन्ही संघांना प्रार्थना करावी लागणार आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला अजूनही संधी आहे कारण इंग्लंडपाठोपाठ त्यांना बांगलादेश आणि अफगाणिस्तानकडून दोन सामने खेळावे लागणार आहेत. इथून दोन विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलचे तिकीट मिळेल.

न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान पराभूत झाले किंवा त्यांचा नेट रनरेट चांगला झाला तरच पाकिस्तान पोहोचेल. न्यूझीलंडच्या बाबतीतही असेच आहे, त्यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा पराभव करावा लागेल.

* भारताला विजयाची संधी

भारताला मात्र विजयाची संधी आहे. कारण जो संघ आहे व त्याची एकंदरीत आतापर्यंतची कामगिरी जर पाहिली तर यंदाचा वर्ल्डकप भारत पटकावेल अशी अपेक्षा आहे.