आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले….

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ असा उल्लेख करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना बंडखोरांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांना आदित्य ठाकरेंनी … Read more

फुटीर गट चंद्रावर पण…; संजय राऊतांचा बंडखोरांना खोचक टोला

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्याचा पुढचा अंक आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या निमित्ताने दिसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटावर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यासंदर्भात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय … Read more

“दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रिपद मिळाले”

मुंबई : मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यावरुन शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बंडखोरांवर चांगलीच आगपाखड केली आहे. महाराष्ट्राची सुत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. … Read more

घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही अन्…; बंडखोरांना आदित्य ठाकरेंचे खडेबोल

मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फूटीमुळे राज्यात मोठा सत्ताबादल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफान कलगितुरा रंगला आहे. मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर टीकास्त्र सोडले आहे.   … Read more

दीपक केसरकर उडते पक्षी; किशोरी पेडणेकर आक्रमक

मुंबई : आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आल्या होत्या. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांच्यावर पेडणेकरांनी चांगलीच आगपाखड केली आहे. दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड … Read more

बंडखोरांविरोधात शिवसेनेची कठोर कारवाई; संतोष बांगर, तानाजी सावतांना पहिला फटका

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. आमदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आमदार परत न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे … Read more

तेव्हा लाज वाटली नाही; आदित्य ठाकरेंना गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षबांधणीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक पुन्हा लढा असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी … Read more

ज्यांचं रक्त भगवं तो ठाकरेंसोबत; आदित्य ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी बंड केला आणि भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी निष्ठा यात्रेला सुरवात केली आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाला भेट देत आहेत. विरोधकांकडून बाकीचे आमदार देखील शिवसेनेला रामराम करतील असा दावा केला जात आहे. असा दावा करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी चांगलंच सुनावलं … Read more