भंडारदरा धरणाला १०० वर्ष पूर्ण, फक्त ८४ लाखात ब्रिटिशांनी उभारलं होतं धरण, ब्रिटिश काळातील स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना!

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील भंडारदरा धरणाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. १९२६ साली ब्रिटिशांनी बांधलेले हे धरण आजही आपल्या मजबूत बांधकामाने आणि निसर्गसौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अवघ्या ८४ लाख रुपये खर्चात उभारलेले हे धरण स्थापत्य शास्त्राचा एक अनमोल ठेवा आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा आणि नंतर गूळ-चुन्याच्या साहाय्याने दगडात रचलेली ही भव्य रचना आजही तितकीच … Read more

निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा, निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सूरू, एवढ्या दिवस सुरू राहणार आवर्तन

राजूर- निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रविवारी, २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलं. डाव्या कालव्यातून २५० क्युसेक आणि उजव्या कालव्यातून २०० क्युसेक अशा एकूण ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार असून, यामुळे अकोले आणि संगमनेर तालुक्यातील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत किती आहे पाणी शिल्लक ? जाणून घ्या भंडारदरा आणि मुळा धरणांचे उन्हाळी आवर्तने कधी सुरू होणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ धरणांमध्ये एकूण २५ हजार ४८२ दलघनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील पाणीस्त्रोतांच्या सद्यस्थितीची सकारात्मक झलक देणारी आहे. एकूण धरणक्षमता आणि पाण्याचा वापर विचारात घेतला असता सुमारे ५० टक्के साठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्याचा वापर जून महिन्याच्या अखेरीपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करावा लागणार आहे. मुळा धरणाचे उन्हाळी आवर्तन मुळा धरणाचे उन्हाळी … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून पाण्याची होतेय गळती, सुरक्षेचा प्रश्नही गंभीर

Bhandardara Dam : महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या भंडारदरा धरणातून पाण्याची गळती होत असून, लाखो रुपये खर्चुनही ही समस्या अद्याप सुटलेली नाही. शासनाच्या विविध प्रयत्नांनंतरही रोज पाणी वाया जात आहे, ज्यामुळे पाणी टंचाईच्या झळा बसणाऱ्या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ब्रिटिश कालखंडात उभारलेल्या या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याला समृद्ध केले असून, शेती ओलिताखाली आली आहे. … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाच्या पाण्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील शेतीची हरितक्रांती

Bhandardara Dam

Bhandardara Dam : भंडारदरा धरण शंभरीकडे झुकत असून धरणाचा ९७वा वाढदिवस रविवारी भंडारदरा धरणावर शेंडीच्या ग्रामस्थांसह अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात येऊन जलपूजन करण्यात आले. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात उंचीवर व दगडात बांधकाम केलेले ब्रिटीशकालीन धरण आहे. भंडारदरा धरणाचे काम १९१० साली सुरु होऊन १९२६ साली ते बांधुन पुर्ण झाले. १० … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण लवकरच होणार शंभर वर्षांचं ! असा झाला होता भंडारदरा धरणाचा जन्म…

Bhandardara Dam

Bhandardara Dam : उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेषा असलेले भंडारदरा धरण शंभरीकडे झुकत चालले असून घरणाला आज ९७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अकोलेच्या पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील रवाईच्या डोंगरातून ऊगम पावणाऱ्या अमृतवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या प्रवरा नदीवर सन १९१० ते १९२६ या दरम्यान ब्रिटीशांनी शेंडी गावाजवळ दोन टेकड्या अडवुन प्रवरेचा खळखळ वाहणारा प्रवाह अडवला आणि … Read more

Bhandardara Dam : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या भंडारदरा धरणाबाबत ब्रेकिंग बातमी !

Bhandardara Dam

Bhandardara Dam : अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण कधी भरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. धरणामध्ये आधीचे ४५ टक्के पाणी शिल्लक असल्याने यावर्षी धरण भरण्याचे सर्व रेकॉर्ड तुटतील, अशी शक्‍यता होती; मात्र भंडारदरा धरणाच्या पाणलोटात कोसळत असलेल्या पावसात अनियमता होती. अखेर काल भंडारदरा धरण ओसंडून वाहू लागले असून ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेले … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण काही तासांत भरणार

Bhandardara Dam

Bhandardara Dam : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाचे असणारे भंडारदरा धरण भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ४१५ दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे. धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफूट झाल्यानंतर भंडारदरा धरण शाखेकडून धरण भरल्याचे दरवर्षी घोषित होत असते. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले धरण आहे. … Read more

Bhandardara Dam : मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण लवकरच भरणार ! आता आहे ‘इतका’ पाणीसाठा

Bhandardara Dam

Bhandardara Dam : भंडारदरा आशिया खंडातील सर्वात उंचावर व दगडी बांधकाम असणाऱ्या भंडारदरा धरणाचा जलसाठा १० टी.एम.सी. झाला असून धरणाला भरण्याचे वेध लागले आहेत. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० टी.एम.सी. च्या पुढे सरकला आहे. भंडारदरा धरणाची पाणी साठवण क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट असून धरणामध्ये गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १० … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण किती भरले ? जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातील पाणीपातळी

Bhandardara Dam

Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणामध्ये ९ हजार ८०८ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. आतापर्यंत भंडारदरा धरण ९० % भरले आहे. धरणाच्या पाणलोटात मंगळवारी पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसुन आले. धरणाच्या पाणीपातळीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी धरण ८३% झाले असताना पाणी प्रवरा नदीमध्ये विसर्जित करण्यात आले होते; मात्र काही दिवसांपासून पाणलोटासह परीसरामध्ये पावसाचा … Read more

Bhandardara Dam : भंडारदारा धरणाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होणार ! देशातील पहिले वॉटर म्युझियम होणार ?

Bhandardara Dam

Bhandardara Dam : उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदारा धरणाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त भंडारदरा धरण परिसरात देशातील पहिले वॉटर म्युझियम उभारावे, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आ. तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाच्या पाठोपाठ निळवंडे धरणही ५० टक्के भरले

Bhandardara Dam

Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाठोपाठ निळवंडे धरणही ५० टक्के भरले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पाऊस मंदावला असल्याने धरणाच्या सांडव्यातुन पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांच्या पुढे गेला असून धरणामध्ये ४३८५ दलघफु पाणी जमा झाले आहे. निळवंडे धरण सध्या … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण इतके भरले, पावसामुळे आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत

Ahmednagar News

Bhandardara Dam : भंडारदरा पाणलोटात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने आदिवासी बांधवांचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. ब्रिटीश कालीन भंडारदरा धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होऊन भंडारदरा धरण ६० टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे अहमदनगरची चेरापुंजी समजली जाते. मागील गुरुवार पासून सुरु झालेल्या पावसाने थोडासुद्धा विसावा न घेता कोसळत आहे. त्यामुळे भात आवणीला … Read more

Ahmednagar breaking : धक्कादायक ..! ‘या’ ठिकाणी नदीत कोसळली पिकअप ; पोलिसांचे शोधकार्य सुरू

Ahmednagar breaking Shocking Pick-up fell into the river at 'this' place

Ahmednagar breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच निळवंडे धरणासह प्रवरा नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रवरा नदी (Pravara River) देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे संगमनेर … Read more

Ahmednagar Tourist place : अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! वीकेंडला भटकंतीसाठी इथे नक्की जा..

Ahmednagar Tourist place Definitely go here for a weekend

Ahmednagar Tourist place : ऐतिहासिक अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) अनेकांसाठी परफेक्ट पिकनिक स्पॉट (perfect picnic spot) ठरू शकतो. याचा मुख्यकारण म्हणजे भंडारदरा येथे असणाऱ्या धरण, ट्रेकिंग, प्राचीन मंदिर, किल्ले, धबधबे होय. येणाऱ्या लाँग वीकेंडसाठी तुम्ही भंडारदराचा प्लॅन आपल्या फ्रेंड्स किंवा कुटुंबासह करू शकतात. भंडारदरा धरणाबद्दल बोलायचं झालं तर दरवर्षी हा धरण १५ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शालेय विद्यार्थीनीचा धरणाच्या भिंतीवरुन पडुन दुर्दैवी मृत्यु

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24 :- भंडारदरा धरणाच्या भिंतीवरून मोबाईल वर चित्रीकरण करण्याच्या नादात तोल गेल्याने एका शालेय विद्यार्थीनीचा धरणाच्या भिंतीवरुन पडुन दुर्दैवी मृत्यु झाला असुन या मृत्युमुळे भंडारदरा धरणाच्या ढिसाळ सुरक्षे यंत्रणेचे पुन्हा लक्तरे वेशीवर टांगले गेले आहेत. अकोले तालुक्यातील ब्रिटिश कालीन भंडारदरा धरण हे उत्तर नगर जिल्ह्याची जीवन रेषा समजले जाणारे.या … Read more

भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडा; मंत्री तनपुरेंना साकडं

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात यंदाचं वर्षात चांगला पाऊस झाला. यामुळे पाण्याची पातळी देखील चांगली वाढली होती. दरम्यान यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाप्रश्न देखील मार्गी लागतो. यातच आता राहुरी तालुक्यातून एक महत्वाची मागणी समोर येऊ लागली आहे. भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी अनिल शिरसाठ … Read more