Ahmednagar Tourist place : अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! वीकेंडला भटकंतीसाठी इथे नक्की जा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Tourist place : ऐतिहासिक अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) अनेकांसाठी परफेक्ट पिकनिक स्पॉट (perfect picnic spot) ठरू शकतो. याचा मुख्यकारण म्हणजे भंडारदरा येथे असणाऱ्या धरण, ट्रेकिंग, प्राचीन मंदिर, किल्ले, धबधबे होय.

येणाऱ्या लाँग वीकेंडसाठी तुम्ही भंडारदराचा प्लॅन आपल्या फ्रेंड्स किंवा कुटुंबासह करू शकतात. भंडारदरा धरणाबद्दल बोलायचं झालं तर दरवर्षी हा धरण १५ ऑगस्टला ओव्हरफ्लो होते . यावर्षी देखील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होत आहे.

या धरणास विल्सन धरण (Wilson Dam) असेही ओळखले जाते. प्रवरा नदीवर आणि जमीन सपाटीपासून १५० मीटर उंचीवर आहे. हे धरण भारताच्या पश्चिम किनारपट्टी वर भंडारदरा गावात आहे. विल्सन धरणाच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते आणि प्रवरा नदीच्या पायथ्याशी मिळतो.

या तलावाला लेक आर्थर हिल किंवा भंडारादरा लेक म्हणूनही ओळखले जाते.भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.

भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर प्रवरा नदीवर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे.

सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पुर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.

भंडारदरा बस स्टॉपपासून १० किमी अंतरावर, पुण्यापासून १५६ किमी आणि मुंबईपासून १७७ किलोमीटर अंतरावर, रंधा धबधबा हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे. विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला ‘अम्ब्रेला फॉल’ असे म्हणतात. हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.

भंडारदरा बस स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर, अंब्रेला धबधबा हे अहमदनगर जिल्ह्यातील भंडंदरारा (wilson) येथे वसलेले एक सुंदर हंगामी धबधबा आहे.

एकेरी वाहतुक सुरू

लॉन्ग विकेंड लक्षात घेत प्रशासन देखील सज्ज झाले आहे. या परिसरात होणारी गर्दी पाहता स्थानिक पोलीस प्रशासन आणि वन विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान एकेरी वाहतुक सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

भंडारदरा आणि शेंडी येथे जाण्यासाठी वाकी फाटा तसंच वारंघुशी फाटा येथून प्रवेश सुरू राहिल. तर परतीचा मार्ग हा शेंडी येथून भंडारदरा धरण ते स्पिलवे गेट, तिथूव गुहिरे गाव ते रंधा मार्गे असणार आहे.

ट्रेकिंग

पश्चिम घाटातील इगतपुरीजवळ भंडारदरा ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठीही उत्तम स्पॉट आहे. अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात भंडारदरा आहे. अहमदनगरपासून हे १५५ किमीवर आहे. रतनगड, कळसूबाई, हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी जाता येऊ शकतं. तसंच प्राचीन अमृतेश्वर शिव मंदिरलाही तुम्ही भेट देऊ शकता. रतनवाडी गाव, राधा धबधबा, अगस्ति देवस्थान ही ठिकाणं भंडारदरामध्ये पाहता येतील. भंडारदरामध्ये आर्थर लेक लोकप्रिय आहे. इथे कॅम्पिंग, बोटिंग, फोटोग्राफीसाठी भेट देऊ शकता.

भंडारदऱ्यात दमदार पाऊस

भंडारदरा (Weekend Place To Visit) भागात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण (Bhandardara Dam Overflow) ओव्हरफ्लो झालं आहे. दरवर्षी १५ ऑगस्टला हे धरण ओव्हरफ्लो होतं. अहमदनगरमधली (Ahmednagar) भंडारदरा, निळवंडे, मुळा धरण चांगली भरली आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात करण्यात येत आहे.