कोणत्याही क्षणी महापौर निवडणूक होणार ! दहा दिवसांत निर्णय घ्यावा लागणार …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी नगरचे राजकारण चांगलेच तापले आहे. विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत 30 जूनला संपत असल्याने कोणत्याही क्षणी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होवू शकते, महापौर पदाच्या निवडणुकासाठी येत्या काही दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने भाजप या निवडणुकीतून बाहेर पडल्याने शिवसेना व राष्ट्रवादीला … Read more

अनाथ झालेल्या बालकांसाठी त्यांच्या नावे पाच लाख रुपयांची मुदत ठेव !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कोरोना आजारामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी त्यांच्या नावे पाच लाख रुपयांची मुदत ठेव सरकार ठेवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी दिली आहे. त्यामुळे पारनेर नगर मतदारसंघातील अनाथ झालेल्या बालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार लंके यांनी केले आहे. कोविड संसर्गामुळे आई … Read more

सामाजिक कार्यकर्त्याची डेरिंग ! थेट तहसीलदारांनाच मागितली खंडणी पण रंगेहाथ…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून ३० हजार रुपये खंडणी स्विकारताना अरुण रोडे यास पोलीस उपनिरीक्षक उगले यांनी रंगेहाथ पकडले. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही रोडे तहसीलदार देवरे यांना धमकावत होता. माझ्यावर गुन्हा दाखल करु नका अन्यथा तुम्हाला मी पाहून घेईन असे तो वारंवार म्हणत होता. झालेल्या या सर्व प्रकाराचे देवरे … Read more

मोठी बातमी : अविनाश भोसले यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) त्यांची पुण्यातील कार्यालये व घरावर छापे टाकत त्यांचे पुत्र अमित भोसले यांना फेब्रुवारी महिन्यात पुण्यातून ताब्यात घेऊन मुंबईत आणले होते. बिलार्ड पिअर येथील कार्यालयात त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. आज ईडीने परकीय चलन नियमन कायद (फेमा) … Read more

मराठा समाजाचं आंदोलन एक महिना पुढे ढकलले !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत आहे. सरकारने त्यासाठी 21 दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन एक महिना पुढे ढकण्यात आल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. नाशिक येथे पार पडलेल्या समन्वयकांच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. आम्ही मराठा समाजाचे पाच मूक आंदोलने जाहीर केली होती. … Read more

जिल्ह्यातील ‘हा’ तरुण ठरला विदेशातून चारापिकांचे बियाणे विकसित करणारा “ग्रास मॅन”

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोमेश्वर लवांडे या युवा शेतकर्‍याने शेती व्यवसायात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध सुरु केला. नवनवीन पिकांचा शोध घेत चार विदेशी आणि सात भारतीय फोर जी बुलेट नेपियरया चारा पिकांची लागवड केली त्यात यश मीळण्यासाठी तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आता शेतकऱ्यांना … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केला गौप्यस्फोट ! म्हणाले पाच वर्षांत…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सध्या राज्यातील राजकारण पेटलेले दिसत आहे,शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तसेच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केलं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, … Read more

राजकीय पदाधिकाऱ्यावर गोळीबार होऊनही पोलीस सुस्त ! सर्वसामान्यांच्या मनात…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सोनई आणि शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या गावठी कट्ट्यांचा वापर होऊन दहशतीचे वातावरण करत खून, गोळीबार व प्राणघातक हल्ले होत असल्याने सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरली आहे. पोलीस यंत्रणेचा या वाढत्या दादागिरीवर अजिबातच धाक राहिला नसल्याने काळ सोकावत चालल्याचा उघड आरोप आता होऊ लागला आहे.चांदा खूनप्रकरण ताजे असतानाच दुसरा … Read more

भंडारदरावरील हक्कासाठी हायकोर्टात याचिका

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  श्रीरामपूर व राहात्याच्या भंडारदऱ्यावरील हक्काच्या पाण्याच्या ५२ टक्के आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात अनिल औताडे व युवराज जगताप यांनी याचिका दाखल केली आहे. याबाबत पत्रकात औताडे व जगताप यांनी म्हटले, की भंडारदरा धरण हे ब्रिटिशांनी बांधले. अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी आणि राहाता या तालुक्यांना त्यांच्या लाभक्षेत्राप्रमाणे पाणी पुरविण्याचे नियमन केले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळासाहेब नाहाटा यांना अटक ! वाचा आज नक्की काय झाले ज्यामुळे….

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी प्रशांत काळे आज दुपारच्या दरम्यान मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी बाळासाहेब नाहाटा यांना अटक करण्यात आली आहे. गावातील नागरिकाने केली होती तक्रार… श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणाथ ग्रामपंचायत च्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगातून अनेक कामे विनापरवाना केले असल्याची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी ! लग्न होवूनही झाले असे काही कि वधू शिवाय वराला जावे लागले घरी …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- विवाह म्हणजे दोन कुटुंबाचे दोन मनाचे मनोमिलन समजले जाते, साताजन्माच्या गाठी याच विधीत बांधल्या जातात पण आज काल या गाठी इतक्या सहजासहजी तोडल्या जातात की यावर चिंतन करण्याची खरी गरज आहे. अहमदनगर जिल्ह्यात केवळ लग्नात वटकण लावण्याच्या प्रथेतून मुलाकडच्या मंडळींचा तोरा पोलीस स्टेशनमार्गे काहीवेळात रेशीमगाठ मोडण्यापर्यंत पोहचल्याने याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोबाईल खेळू नको म्हटल्याने तेरा वर्षाच्या मुलाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  श्रीरामपूर शहरात बोरावके कॉलेज परिसरात असणाऱ्या इंदिरानगर भागात राहणारा एक तेरा वर्षीय मुलगा चिरंजीव आरुष याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन त्याची जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. साखर साखर कामगार रुग्णालयातील डॉक्टरांनी आरुषला उपचारापूर्वीच मयत असल्याचे घोषित केले. या घटनेवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद … Read more

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होणार नगरपालिका !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  नगर तालुक्यातील नगरपालिकेच्या निकषात बसणाऱ्या नागरदेवळे, वडारवाडी, केतकी- शहापूर या तीन ग्रामपंचायती मिळुन लवकरच नगरपालिका होणार आहे. या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली . नगर तालुक्यातील पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना ते म्हणाले की, बऱ्यापैकी शहरीकरण झालेले असतानाही नागरदेवळे, वडारवाडी, केतकी – शहापूर … Read more

दूध उत्पादकांचा प्रश्न : स्वाभिमानी’ उतरणार रस्त्यावर !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सद्यस्थितीत दुधाचा धंदा अत्यंत तोट्यात आहे. त्यामुळे दूधउत्पादक शेतकरी तीव्र संकटात सापडले आहेत. परिस्थिती गंभीर स्वरूपाची असताना याकडे पशूसंवर्धन व दुग्धोत्पादन खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नेवासा येथे … Read more

कोपरगावात शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  शिवसेनेचा ५५वा वर्धापन दिन शहर आणि उपनगरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.सकाळपासून विविध शाखांमध्ये सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली होती. कुठे रक्तदान शिबीर, तर कुठे कोविड योद्ध्यांचा सन्मान, नर्स व आशा सेविका यांना जीवनावश्यक वस्तूंमध्ये संपूर्ण किराणा किट व मिठाई वाटप, … Read more

श्रीरामपूरात पोस्ट कोविड आजार उपचारासाठी रुग्णालय सुरू

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना आजही वेगवेगळे त्रास होत आहेत त्यासाठी आयुर्वेद उपचार ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले. श्रीरामपूर आयुर्वेद पोस्ट कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, तहसीलदार प्रशांत पाटील, डॉ. सतीश भट्टड, डॉ. महेश … Read more

आज ४५० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २८३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

श्रीगोंदे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : राहुल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-कोरोना काळात इतर विकास कामांना कात्री लागत असतानाही श्रीगोंदे नगरपालिका नगराध्यक्ष शुभांगी पोटे, गटनेते मनोहर पोटे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे जिह्यातील मंत्री, तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते यांच्या मदतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये निधी मिळवला. भविष्यात देखील निधी मिळवू … Read more