शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; चारचाकी केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. नुकतेच … Read more

मंत्री गडाखांच्या प्रयत्ननातून जिल्ह्यासाठी साडेसात हजार टन खत उपलब्ध होणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जिल्ह्यातील खताची टंचाई लक्षात घेऊन नामदार शंकरराव गडाख यांनी आरसीएफ, नर्मदा व जीएसएफसी या प्रमुख खत कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क करून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर संबंधित कंपन्यांनी येत्या आठ दिवसात नगर जिल्ह्यासाठी 7 हजार 500 मेट्रिक टन खत उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा खताचा … Read more

30 लाखांच्या तेलाची चोरी करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- संगमनेर शहर पोलिसांनी व्यापार्‍याच्या तेलाचा अपहार करून पसार झालेल्या मुख्य आरोपींना गजाआड केले आहे. या आरोपींकडून 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे तेलाचे डबे व दीड लाख रुपये रोख असा 9 लाख 83 हजार 859 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरत येथील एल. … Read more

गायब झालेल्या पावसाने भंडारदरा आणि मुळा पाणलोट परिसरात हजेरी लावली

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यातील बळीराजाला समाधान मिळवून दिले; मात्र चार दिवसांपासून वरुणराजा गायब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागाला त्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान गायब झालेल्या पावसाने बुधवारी दिवशी भंडारदरा आणि मुळा पाणलोटातून पुनरागमन झाल्याने शेतकर्‍यांच्या पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत. मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर पाणलोटात मान्सूनही दाखल झाला. … Read more

पशुपालकांमध्ये भीती वाढली, चोरट्यांकडून होतेय शेळ्यांची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. घरफोडी, लूटमार आदी घटनां तर होत आहेच मात्र आता चोरट्यांकडून पशुधन चोरले जात असल्याचे प्रकार घडू लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोटाला चिमटा घेऊन मोठ्या जिकरीने जगवलेले पशूधन चोरीस गेल्यामुळे पशुपालक संतापले असून बेलापूर पोलिसांना बकरीचोर शोधण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान … Read more

पेरणीसाठी खते – बी -बियाणांची खरेदी केली मात्र पावसाअभावी बळीराजा झाला चिंतातुर

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जूनच्या सुरुवातीलाच पाऊस सर्वत्र सक्रिय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना जून महिना अर्धा संपला तरी पावसाने हवी तशी हजेरी अद्यापही जिल्ह्यात लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पेरणी प्रश्नावरून मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान बुधवारी जिल्ह्यातील राहाता तालुक्यात दुपारच्या सुमारास दमदार सरी कोसळल्या. मात्र ग्रामिण भागात … Read more

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते वानर पोहचेल थेट विजेच्या पोलवर

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- काही दिवसांपासून वन्यप्राण्यांची मोठी वाताहत सुरु असलेली पाहायला मिळते आहे. या प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढू लागला आहे. व यातूनच काहींना काही दुर्घटना घडत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. नुकतेच देवठाण मध्ये एक वानर कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका म्हणून थेट विजेच्या पोलवरच चढले. महावितरणच्या वायरमनने तात्काळ वीज पुरवठा खंडीत … Read more

अरे बापरे ! देशात आढळला बुरशीचा ‘हा’ नवा प्रकार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- एकीकडे कोरोनाच्या विळख्यातून कुठेतरी बाहेर पडत असतानाच बुरशीजन्य आजाराने आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे कोरोनामुळे आधीच हैराण झालेल्या नागरिकांना आता बुरशीजन्य आजाराचा सामना करावा लागत आहे. मात्र हा आजार दिवसेंदिवस आपले वेगळे वेगळे रूप दाखवत आहे. सुरवातीला ब्लॅक फंगस व्हाईट फंगस येलो फंगसनंतर आता ग्रीन फंगसही सापडला आहे. … Read more

कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर हे औषध ठरतेय गुणकारी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- देशात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारं 2-DG औषध संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं ( डीआरडीओ) विकसीत केलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आता 2-DG औषध कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. 2-DG … Read more

गांधीगिरी ! लाच मागत असलेल्या कर्मचाऱ्याचा कार्यालयाबाहेर सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांना लाचखोरीचे व्यसनच जणू लागले आहे. जिल्ह्यात महसूल व पोलीस विभाग लाचखोरीमध्ये अव्वल आहे. यातच खासगी कंपन्यांमध्ये देखील लाचखोरी फोफावत आहे. कर्जतमध्ये तर एक अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. भाजपा किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांनी शेतकऱ्यांना लाच मागत असलेल्या कर्मचाऱ्याचा कर्जत येथील कार्यालयाबाहेर गांधीगिरीने … Read more

ठेवीदारांना गंडा घालणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ‘अर्धनग्न आंदोलन’

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात ठेवीदारांना लाखोंचा गंडा घालून पसार झालेल्या काष्टी येथील धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा ज्योती गवळी व रमेश गवळी या दाम्पत्यास तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ठेवीदारांनी अर्धनग्न आंदोलन केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, गवळी दाम्पत्याने पतसंस्थेत ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एक वर्षापूर्वी सहायक निबंधक रावसाहेब खेडेकर … Read more

मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड; 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे पोलिसांकडून कारवाई सत्र सुरूच आहे. नुकतेच राहुरीत एका मटका अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी धाड टाकून सुमारे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण 16 जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार … Read more

मृतावस्थेत आढळले मादी जातीचे हरण; शिकार की आणखी काही?

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून भक्ष्याच्या शोधात तसेच पाण्यासाठी वन्यप्राणी जंगलातून मानवीवस्तीकडे येऊ लागल्याचे दिसून येत आहे. यातच अनेकदा वाहनाच्या धडकेत प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडल्या आहेत. यातच श्रीरामपूर शहरात एक मादी जातीचे हरीण मृतावस्थेत आढळले. या हरणाची बिबट्याने शिकार केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

इलेक्ट्रॉनिक मोटार काढताना 26 वर्षीय मजूरचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शेतीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढताना एका मजूरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोनई पोलिस ठाण्याच्या समोर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांनी संबंधित विहिर मालकांवर गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी कि, घोडेगाव-जुना चांदा रस्त्याच्या शिवारात घोडेगाव येथील अशोक नहार यांच्या शेतातील विहिरीतील … Read more

अहमदनगरमध्ये भरदिवसा खून… आरोपीच्या आवळल्या मुसक्या!

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- अहमदनगर शहरातल्या दिल्लीगेट भागात असलेल्या पुरातन बारवेजवळ एका अज्ञात इसमाचा खून करण्यात आला आहे. दारु पिण्याच्या कारणावरुन हा खून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.आज (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, डोक्यात दगड घालणार्‍या एका संशयीत इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. … Read more

‘आमच्याकडील चावीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू…’

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- राजकारणात चावी द्यावीच लागते. मग ते पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत की माजी मुख्यमंत्री. आम्ही आमच्याकडे असलेल्या चावीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत हे … Read more

आरक्षणासाठी आता ओबीसींचा गुरुवारी ‘आक्रोश’

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- आरक्षणासाठी आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. गुरुवारी,१७ जून रोजी समता परिषदेने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ‘ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’चं आयोजन केले आहे. या मोर्चा ची माहिती देताना मंत्री भुजबळ म्हणाले, गुरुवारी आम्ही ओबीसींचा आक्रोश मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा केंद्र किंवा … Read more

विकास कामांसाठी ४ कोटी ७ लाख ७५ हजार रुपये निधी मंजूर – हर्षदा काकडे

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- जिल्हा परिषदेच्या लाडजळगाव गटातील विविध विकास कामांसाठी ४ कोटी ७ लाख ७५ हजार रुपये निधी मंजूर झाला असून, लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती गटाच्या सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी दिली. गेल्या वर्षापासून कोविड-१९ च्या साथीमुळे जिल्हा परिषदच्या निधीमध्ये कपात झाली होती; परंतू यावर्षी विकास कामांसाठी जिल्हा … Read more