काय सांगता ! अवघ्या आठ मिनिटात चोर जेरबंद आणि ते देखील महाराष्ट्रात?

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-आजही अनेक गुन्हे पोलिसात दाखल केले जात नाहीत. कारण बहुतांश वेळा गुन्हा दाखल झाल्यानंतर कित्येक दिवस, महिने कधी कधी तर वर्ष असेच जातात मात्र गुन्हेगारांचा तपास लागत नाही. त्यामुळे ‘गुन्हा दाखल करून करणार तरी काय’ असा विचार करून अनेकजण गुन्हा दाखल करत नाहीत. मात्र नुकतेच पोलिसांनी गुन्हा केल्यानंतर अवघ्या … Read more

अरे हे काय चाललंय राज्यात ? आता काय म्हणे तर रिफ्लेक्टरचा तुटवडा आहे !

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-आतापर्यंत आपण कोरोना रुग्णांसाठी लागणारी औषधे,ऑक्सिजन अथवा इतर वैद्यकीय साधनांचा तुटवडा असल्याचे ऐकले व पहिले आहे. मात्र आता एक वेगळ्याच गोष्टीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो म्हणजे वाहनाच्या पाठीमागे रिफ्लेक्टरचा. परिणामी परत एकदा दरवाढ करून या वाहनधारकांना झटका दिला जाणार आहे, त्यामुळे मात्र वाहनचालक चिंतेत पडले आहेत. परिवहन संवर्गगातील … Read more

‘तिच्यासह’ बिबट्या विहिरीत पडल्याने एकच खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द मध्ये केशव गोविंद बनातील भगत वस्ती येथील शेतकरी रमेश भगत यांच्या विहिरीत काल 9 जून च्या रात्री शेळी पकडण्याच्या नादात शेळीसह बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती परिसरामध्ये वेगाने पसरल्याने बघ्यांची एकच गर्दी झाली. बिबट्या व शेळी पडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला … Read more

‘त्या’ खाजगी कोविड सेंटर चे शासकीय मोफत कोविड सेंटर मध्ये रूपांतर होणार असल्याने उपोषण स्थगित

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे इमारती मधील खाजगी कोविड सेंटर चे शासकीय मोफत कोविड सेंटर मध्ये रूपांतर करण्याचे नगरपरिषद आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी लेखी पत्र देऊन मान्य केलेने देवळाली प्रवरा नगरपालिकेचे गेट समोर दि. १० जून रोजी करणार असलेले आमरण उपोषण तूर्त स्थगित केले असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब … Read more

भाच्याचे कारस्थान मामीने केले उघड; पितळ उघड पडताच आरोपी फरार

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- मामाकडून पैसे न मिळाल्यामुळे रागातून भाच्याने मामाविरुद्ध कट रचला अन तक्रार देण्यासाठी कर्जत पोलीस ठाणे गाठले. मात्र भाच्याचे बिंग मामीने उघडकीस आणले. दरम्यान हा प्रकार कर्जात तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा कर्जत रोडवर दूरगाव फाटा येथे दोन अज्ञात मोटारसायकल स्वरांनी आरोपी सागर निंभोरे याला … Read more

कर्जदाराच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- संगमनेरमधील इक्विटास स्माल फायनान्स या बँकेच्या उपशाखा अधिकाऱ्याने कर्जदारांच्या १ लाख ५४ हजार रुपये रकमेचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, इक्विटास स्माल फायनान्स या बँकेचा … Read more

श्रीरामपूरकरांसाठी महत्वाची बातमी…आज लसीकरण बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, मात्र ती काहीशी कायम आहे. यामळे लसीकरण प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र नेहमीप्रमाणे लसीचा तुटवडा जाणवत असल्याने हि मोहीम वारंवार खंडित होत आहे. यामुळे श्रीरामपूर मध्ये आज लसीकरण होणार नसल्याची माहिती मिळते आहे. ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत … Read more

जिल्ह्यातील या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये दहशत

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या व त्याच्या हल्ल्याच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच बिबट्याने राहुरी राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फूणगी येथील राऊतवाडी परिसरात मध्यवस्तीत बिबट्याने धुमाकूळ एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेवरून परिसरातील … Read more

जिल्ह्यातील तब्बल दीड लाख बेशिस्तांकडून वसूल केले पाच कोटी

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच पोलिसांनी एक लाख 49 हजार 289 जणांवर कारवाई करून तब्बल चार कोटी 83 लाख 22 हजार 500 रूपयांचा दंड वसूल केला. विशेषबाब म्हणजे पोलीस विभागाने मार्च ते 7 जून 2021 या तीन महिन्याच्या कालावधीत ही आक्रमक कारवाई … Read more

शिर्डीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यांवर शुकशुकाट होता. मात्र अनलॉक होताच अवैध धंदे सुरु झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. यातच जिल्ह्यातील शिर्डी मध्ये पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शेळके कॉर्नरसमोर दिवसा ढवळ्या … Read more

मान्सूनने हजेरी लावल्याने शेतकरी शेती कामांत गुंतला…

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- मान्सूनचे आगमन झालं असून गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच झालेल्या या पावसामुळे बळीराजा सुखावला असून आता शेतकऱ्यांनी शेतातील कामे सुरु केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. अनेक … Read more

चोरटयांनी देशी दारूचे दुकान लुटत पुरावेही केले गायब

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- एका देशी दारूच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांची दारू लंपास केली केली. तसेच चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेराही काढून नेला. चोरीची हि घटना श्रीरामपूर शहरालगत अशोकनगर फाट्याजवळ घडली आहे. याप्राकरणी श्रीरामपूर शहर पोली ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अशोकनगर फाट्याजवळील … Read more

तलवारीचा धाक देत मारहाण करून रस्तालूट करणारे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- तलवारीचा धाक दाखवून मारहाण करून रसतालुट करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यास राहाता तालुक्यातील लोणी पोलिसांना यश आले आहे. राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे दिनांक ४ जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अक्षय लहुजी खैरे हा वडिलांना घेऊन तिसगाव कडे जाणाऱ्या लोहगाव चौकाकडे येत असताना समोरून आलेले मनीष सारसर व अमर … Read more

ना. थोरात म्हणतात; शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी विधेयक आणू !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- केंद्र सरकारचे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने सुधारणेच्या नावाखाली आणलेले काळे कृषी कायदे शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहेत. साध्या पॅन कार्ड वर कुठलाही … Read more

केंद्राचा बळीराजाला दिलासा! खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- सलग दोन वर्ष कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने पुरता हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मोदी सरकारने काहीसा दिलासा दिला आहे . कोरोनामुळे लॉकडाउन केले त्यामुळे हाताला काम नाही व शेतात असलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाले. त्यात परत वाढलेली महागाई यामुळे बेजार झालेल्या बळीराजाला सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय … Read more

आयुक्तांच्या ‘त्या’ आदेशानंतर वैद्यकीय आरोग्यअधिकाऱ्यांचे पत्र

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- कोरोना काळात मला दिलेली कामे मी पूर्ण केली आहेत. त्यामुळे मला सक्तीच्या रजेवर जाण्याची आवश्यकता नाही. असे पत्र महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिले आहे. आयुक्त गोरे यांनी मंगळवारी डॉ. बोरगे यांच्या सक्तीच्या रजेचा आदेश काढला होता. त्यांचा अतिरिक्त पदभार डॉ. … Read more

‘ते’ जोडपं श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- सातारा येथून पळून आलेले  एक अल्पवयीन जोडपे नागरिकांच्या मदतीने श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून  त्यांना आता सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एका गावातुन अल्पवयीन तरुण तरुणीचे जोडपे दोन दिवसापूर्वी मुंबईला पळून गेले होते. मुंबईला दादर भागात काही काळ थांबले व  तेथून ते बसने … Read more

राहाता शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तिने घेतला ‘जनता कर्फ्यु’ चा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- गर्दीमुळे पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राहाता शहरातील व्यपा-यांनी स्वयंस्फुर्तिने प्रत्येक गुरुवारी जनता कर्फ्यु व इतर दिवशी सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राहाता शहरातील व्यावसायांमध्ये दुकाने दररोज किती वाजेपर्यंत सुरू ठेवावी यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर व्हावा यासाठी नगराध्यक्षा … Read more