राज ठाकरेंच्या भाषाणानंतर राष्ट्रवादी आक्रमक, अशी केली तुलना

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी थेट आरोप केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. प्रवक्ते महेश तपासे यांनी व्हिडीओ शेअर करत ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. पवारसाहेबांच्या नखाइतकी उंची जर राज … Read more

जयंत पाटील म्हणाले तर कठोर कारवाई करू, पण कशी ते सांगू शकत नाही

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादमधील भाषण महाविकास आघाडीच्या सरकारने गांभीर्याने घेतले आहे. त्यांच्या भाषाणाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा एक गट काम करीत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. भाषणानंतर पाटील प्रतिक्रिया … Read more

बंधू मुख्यमंत्री असेपर्यंत राज ठाकरे….जयंत पाटलांचा टोला

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news :- ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता उत्तर प्रदेशचे कौतूक केले आहे. महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांचे कौतुक करण्यासाठी ते दौरे करतील. जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलेले दिसते,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

Maharashtra News : पवारांच्या घरावर हल्ला, त्या कर्मचाऱ्यांसंबंधी परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Maharashtra News :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना एसटीच्या सेवेत पुन्हा घेणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. दोन दिवसांपूर्वी पवार यांच्या मुंबईतील घरावर संपकरी एसटी कर्मचारी चाल करून गेले होते. त्यातील शंभराहून अधिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगराध्यक्षांकडून अभियंत्याला मारहाण ! सीसीटीव्हीमध्ये चित्रित…

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 AhmednagarLive24:- सांगितलेले काम वेळेत केले नाही म्हणून नगराध्यक्षांचा पारा चढला आणि त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याला मारहाण केली. दालनात सुरू झालेली धक्काबुक्की बाहेरपर्यंत आली. शेवटी महिला मुख्याधिकारी मध्ये पडल्या आणि त्यांनी मोठ्या धाडसाने वाद सोडवत आपल्या अधिकाऱ्याची सुटका केली. पारनेर नगरपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी ही घटना घडली. नवनिवार्चित नगराध्यक्ष, राष्ट्रवादी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: भाजपच्या ‘या’ पदाधिकार्‍याला धमकी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 AhmednagarLive24 :- गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन सखाराम पोटरे यांना वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तशी तक्रार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी अधीक्षक पाटील यांची भेट घेवुन निवेदन दिले आहे. यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह … Read more

आमदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढणार ? शिवसेना नेते म्हणतात आमचाच…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022  Ahmednagar Politics :- आधी शिवसेना नगरसेवकांची फोडाफोडी आणि नंतर करोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केले काम यामुळे पारनेर तालुका चर्चेत आला आहे. आधी विधानसभा आणि नंतर नगरपालिका असे दोन पराभवाला समारे जावे लागलेल्या शिवसेनेने आता पुन्हा या तालुक्यावर दावा ठोकला आहे. पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकींग …भाजपला धक्का, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचे निकटवर्तीय व राहुरी तालुका भाजप अध्यक्ष अमोल भनगडे व काही विश्वासू समर्थकांनी आज दुपारी २.०० वाजता भाजपला रामराम करून मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील,ना.जितेंद्र आव्हाड, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान माजी आ.शिवाजीराव कर्डीले हे … Read more

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केले वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना बोलत होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला असून याप्रकरणी सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. नेमके काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी? :- … Read more

पद आणि गोपनियतेची शपथ घेत..’या’ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- पारनेर नगर पंचायत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली आहे. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांची निवड 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्यांनी मंगळवारी पदभार घेत असताना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्याचबरोबर सत्ताधारी नगरसेवकांनी सुद्धा आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत जनसेवेचे व्रत स्वीकारले. विजय औटी आणि सुरेखा भालेकर यांच्या अनोख्या पदग्रहण … Read more

पुण्यातील कुख्यात गँगस्टरची पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.यामुळे राजकारणात काही देखील होऊ शकते. याचा प्रत्यय पुणेकरांना आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप … Read more

1 फेब्रुवारीपासून तमाशाचा फड रंगणार, उपमुख्यमंत्री अजित पवार…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  तमाशा कलावंतांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 1 फेब्रुवारी पासून तमाशाच्या फडांना मुभा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत कलावंतांना तसं आश्वासन मिळालेलं आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकरांनी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे … Read more

पारनेर नगरपंचायत ! सत्ता स्थापनेचा राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलेच ढवळून निघत आहे. निवडणुकीचा धुराळा उडाला असून आता सत्ता स्थापनेसाठी पारनेरात मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहे. यातच पारनेर नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तिसरा अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनी आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शहरविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे … Read more

शहरात लसीकरण केंद्रावर लस न घेताच सुरु आहे नोंदणीचा धक्कादायक गैरप्रकार

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  शहरातील काही लसीकरण केंद्रावर लस न घेताच सुरु असलेल्या नोंदणीचा गैरप्रकार थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले.(Vaccination Center)  यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष … Read more