पद आणि गोपनियतेची शपथ घेत..’या’ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- पारनेर नगर पंचायत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली आहे. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांची निवड 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्यांनी मंगळवारी पदभार घेत असताना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

त्याचबरोबर सत्ताधारी नगरसेवकांनी सुद्धा आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत जनसेवेचे व्रत स्वीकारले. विजय औटी आणि सुरेखा भालेकर यांच्या अनोख्या पदग्रहण समारंभाचे पारनेरकरांनी कौतुक केले. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पारनेर नगरपंचायतीचे वर आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ता प्रस्थापित केली आहे.

16 फेब्रुवारी झालेल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीच्या वेळी 17 पैकी 11 मतं मिळवून विजय सदाशिव औटी नगराध्यक्ष झाले. सुरेखा अर्जुन भालेकर यांची उपनगराध्यक्ष पदी वर्णी लागली. पारनेर शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याच्या अनुषंगाने आगामी काळात काम केले

जाईल अशा प्रकारचा विश्वास यावेळी आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. पदाधिकारी आणि अधिकारी हे दोन चाके आहेत. त्यांनी सोबत काम केल्यानंतर नक्कीच विकास जलद गतीने करता येईल असे मतही त्यांनी व्यक्त केले. पारनेर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबरोबरच इतर अनेक समस्या आहेत.

त्या निकाली काढण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा केला जाईल असा शब्दही त्यांनी दिला. विरोधात काम करणे सोपे असते मात्र जेव्हा सत्तेत आपण येतो तेव्हा जबाबदारी आणखी वाढते. त्याचबरोबर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सर्व जनतेचे असतात.

त्यामुळे कोणताही दुजाभाव न करता पारनेर शहरातील सर्वांची कामे झाली पाहिजेत असा सल्ला सुद्धा आमदार निलेश लंके यांनी यावेळी दिला. या शहराच्या विकास कामांकरिता आमदार म्हणून आपल्या दोन पावले पुढे जावुन काम करेल असा शब्दसुद्धा यावेळी देण्यात आला.

तत्पूर्वी आमदार निलेश लंके यांनी नगराध्यक्ष विजय औटी आणि सुरेखा भालेकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आ. लंके यांनी दिल्या. यावेळी माजी सभापती सुदाम पवार,

जेष्ठ नेते राजेंद्र चौधरी, ऍड राहुल झावरे, डॉ. बाबासाहेब कावरे विजय डोळ, संदीप चौधरी यांच्यासह नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेत शपथविधीची पहिलीच वेळ!

विधिमंडळ आणि संसदेत सदस्यांना शपथ दिली जाते म्हणजे अनुक्रमे आमदार व खासदार शपथ घेऊन कामकाज सुरु करतात. या व्यतिरिक्त राज्य व केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडतो.

मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदग्रहण करत असताना अशा प्रकारे शपथ घेऊन कामकाजाला सुरुवात करण्याची पहिलीच वेळ आहे. या माध्यमातून पारनेर नगर पंचायतीने राज्यासमोर एक वस्तुपाठ ठेवला आहे.