शहरात लसीकरण केंद्रावर लस न घेताच सुरु आहे नोंदणीचा धक्कादायक गैरप्रकार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  शहरातील काही लसीकरण केंद्रावर लस न घेताच सुरु असलेल्या नोंदणीचा गैरप्रकार थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले.(Vaccination Center) 

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर,

केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, संतोष हजारे, अनिकेत येमूल, शहानवाझ शेख, वैभव म्हस्के, विशाल म्हस्के, वैभव शेवाळे, प्रशांत सराईकर, हेमराज भालसिंग, सनी साठे, गणेश मिसाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर शहरातील अनेक लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याची केवळ नाव नोंदणी होत असून, त्यांना लस न देताच हा गैरप्रकार सुरु आहे. सदर नागरिकांनी लस न घेताच केवळ नाव नोंदणी करून लस घेतल्याचे जाहीर केले आहे.

कोरोनाच्या नव्या मायक्रॉन विषाणूचा संक्रमण सुरु आहे. या धर्तीवर ही बाब अत्यंत भयानक आणि गंभीर आहे. यामुळे इतर नागरिकांना गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

अशा कोरोना लसीकरण केंद्रावर चालणार्‍या बनावट कारभाराविरोधात कठोर पावले उचलून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याप्रकरणी आयुक्तांशी बोललो असून, संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच सदर मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना देखील देण्यात आले.