आज iPhone 13वर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या काय करावे लागेल?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flipkart Big Billions Days Sale : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलचा आज शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये स्मार्टफोन आणि अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आजच योग्य वेळ आहे. सर्वात महागडे फोन स्वस्त मिळत आहेत. जर तुम्ही आयफोनचे चाहते असाल आणि तुम्हाला आयफोन 13 घ्यायचा असेल तर तुम्हाला तो कमी बजेटमध्ये मिळेल. तुम्ही जवळपास 30 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह फोन ऑर्डर करू शकता. कसे ते जाणून घ्या…

फ्लिपकार्ट बिग बिलियन्स डेज सेल

iPhone 13 ची लॉन्चिंग किंमत 69,900 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर 58,990 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच संपूर्ण फोनवर 10,910 रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय, अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर आहेत, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल.

आयफोन 13 बँक ऑफर

जर तुम्ही आयफोन 13 खरेदी करण्यासाठी ICICI डेबिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळेल. यामुळे फोनची किंमत 57,490 रुपये असेल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होईल.

आयफोन 13 एक्सचेंज ऑफर

iPhone 13 वर 16,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला खूप सूट मिळेल. पण 16,900 रुपयांची एक्सचेंज ऑफ फक्त फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळू शकलात तर फोनची किंमत 40,590 रुपये असेल.