Noise VS102 Neo : 40 तासांची बॅटरी लाईफ आणि मजबूत आवाजासह लॉन्च झाले Noise चे इअरबड्स, किंमत आहे फक्त 999

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Noise VS102 Neo : भारतीय बाजारात Noise ची दोन इअरबड्स लाँच झाली आहेत. जी तुम्हाला खूप कमी किमतीत खरेदी करता येतील. यात कंपनीकडून शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. Noise VS102 IPX5 वॉटर रेझिस्टन्ससह सुसज्ज असून ते एकूण 40 तासांचा प्लेबॅक देते.

Noise VS106 10mm ड्रायव्हर्ससह सुसज्ज असूनहे इअरबड्स 50 तासांचा प्लेबॅक देते. जर तुम्हाला हे इअरबड्स खरेदी करायची असतील तर तुम्हाला कंपनीची वेबसाइट आणि Amazon वेबसाइटवर जावे लागणार आहे. ही दोन्ही इअरबड्स तुम्हाला वेगवेगळ्या कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येतील. जाणून घ्या फीचर्स आणि किंमत.

जाणून घ्या Noise Buds VS102 Neo आणि Noise Buds VS106 किंमत

नॉईजचे VS102 निओ कार्बन ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन, आइस ब्लू, पर्ल पिंक आणि सॉफ्ट लिलाक रंगांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. हे इयरबड्स कंपनीची वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर उद्यापासून 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येतील. VS106 क्लाउड व्हाइट, स्काय ब्लू आणि जेट ब्लॅक रंगांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. हे इयरबड्स 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून कंपनीची वेबसाइट आणि Amazon वेबसाइटवर 1,299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळतील.

जाणून घ्या फीचर्स

कंपनीच्या या दोन्ही TWS इअरबड्समध्ये क्वाड माइक एनवायरमेंट नॉइज कॅन्सलेशन तंत्रज्ञान देण्यात आले आहे, जे उत्तम कॉल गुणवत्ता प्रदान करेल. Buds VS102 Neo 11mm ड्रायव्हर्स पॅक करत असून Buds VS106 10mm ड्रायव्हर्ससह येतात. यात हायपर सिंक तंत्रज्ञानाचा सपोर्ट आहे.

इतकेच नाही तर या इअरबड्सना पाणी आणि घामाच्या प्रतिकारासाठी IPX5 रेटिंग मिळाली आहे. यात तुमच्यासाठी TWS इयरबड्समध्ये ब्लूटूथ v5.3 सपोर्ट आणि एक टच कंट्रोल्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. Buds VS106 मध्ये 40ms ची अल्ट्रा-लो लेटेंसी असून ते 40 तासांचा प्लेबॅक देते. तर हे इअरबड 10 मिनिटांच्या चार्जिंगसह 120 मिनिटांचा प्लेटाइम देईल. कंपनीचे Buds VS102 Neo 40 तासांचा प्लेबॅक वेळ देते.