OnePlus Foldable Phone : वनप्लस देणार सॅमसंगला टक्कर! लॉन्च करणार ‘हा’ मस्त फोल्डेबल फोन, दमदार प्रोसेसरसह किंमत असेल..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Foldable Phone : बाजारात सध्या फोल्डेबल स्मार्टफोन्सची क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे सतत फोल्डेबल स्मार्टफोन्सची चर्चा सुरु आहे. बाजारात धुमाकूळ घालताना आपल्याला हे फोन दिसत आहेत. अशातच सॅमसंगचे फ्लिप आणि फोल्ड फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

काही दिवसांपूर्वी ओप्पोनेही आपला फोल्ड फोन लाँच केला होता. याच कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता OnePlus बाजारात उतरली आहे. कंपनी लवकरच आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. जो या दोन्ही कंपन्यांना टक्कर देईल.

वनप्लसचे सीईओ पीट लाऊ यांनी फोनचे तपशील शेअर केले असून याबाबत त्यांनी असे सांगितले आहे की, ‘कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन या वर्षी ऑगस्टपर्यंत बाजारात येणार आहे. कंपनीचा फोल्डेबल फोन प्रथम न्यूयॉर्कमध्ये लॉन्च करण्यात येईल’.

केव्हा लाँच होणार स्मार्टफोन ?

लीक्सनुसार, सॅमसंगच्या गॅलेक्सी झेड फोल्ड 5 तसेच फ्लिप 5 नंतरच OnePlus बाजारात पदार्पण करणार आहे. त्यामुळे आपल्याला सॅमसंग आणि वनप्लस यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. न्यूयॉर्कनंतर कंपनी इतर ठिकाणीही कंपनी आपला आगामी फोन लॉन्च करणार आहे.

हे लक्षात ठेवा की हा स्मार्टफोन त्या सर्व ठिकाणी उपलब्ध असेल जेथे OnePlus आधीच अस्तित्वात आहे. लीक्सनुसार, Oppo देखील आपला नवीन फोल्डिंग फोन Find N3 या वर्षी म्हणजे ऑगस्टमध्ये चीनी बाजारात लॉन्च करणार आहे. OnePlus हा फोन रीब्रँड करून आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या फीचर्स

OnePlus चा फोल्डिंग फोन 8-इंचाच्या आतील डिस्प्ले सह येईल. ज्यात 6.5-इंचाचा दुय्यम डिस्प्ले असेल. या फोनचे दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतील.

याच्या प्रोसेसर बद्दल बोलायचे झाल्यास यात Snapdragon 8 Gen 2 वापरण्यात येईल. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 16GB रॅम + 512GB स्टोरेज सह येईल. OnePlus चा फोल्डेबल फोन Android 13 वर आधारित Oxygen OS 13.1 वर काम करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या वेळी OnePlus आपला फोल्डेबल फोन लॉन्च करणार आहे, त्याच वेळी Google Android 14 देखील लॉन्च होऊ शकतो.

आगामी फोनमधील प्राथमिक कॅमेरा 50MP, 48MP अल्ट्रावाइड आणि 32MP टेलिफोटो लेन्स असेल. तसेच 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात येऊ शकतो. आगामी फोनला 4800mAh बॅटरी मिळेल जी 80W चार्जिंगला सपोर्ट करेल.