पासपोर्ट फोटो लागत आहे आणि तुमच्याकडे आता नाही! अहो नका करू काळजी, वापरा ही पद्धत आणि आणि मिळवा तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बऱ्याचदा कुठल्याही शासकीय कामांमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. प्रामुख्याने आधार कार्ड, पॅन कार्ड  आणि ज्या कामासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे किंवा जे काम तुम्हाला करणे आवश्यक आहे त्याच्याशी संबंधित असलेले इतर कागदपत्रे तुम्हाला लागतात.

या कागदपत्रांव्यतिरिक्त तुम्हाला एक गोष्ट आवश्यक लागते व ती म्हणजे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो होय.बऱ्याच कामांमध्ये तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो हा द्यावाच लागतो. त्यामध्ये अगदी तुम्हाला शाळा किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल यापासून तर अनेक शासकीय आणि बँकिंग क्षेत्रातील कामांसाठी पासपोर्ट आकाराचा फोटो हा आवश्यक लागतोच लागतो.

परंतु बऱ्याचदा यामध्ये आपल्याला पासपोर्ट फोटोची आवश्यकता भासते आणि त्याच वेळेस आपल्याकडे पासपोर्ट साईज फोटो नसतो. तसेच यासंबंधीची दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या फोटो स्टुडिओ मधून पासपोर्ट आकाराचे फोटो काढायला गेलात तर तुम्हाला पन्नास रुपयांमध्ये साधारणपणे आठ फोटो मिळतात.

परंतु जर आपण एखाद्या कामासाठी किंवा तुम्हाला जर पासपोर्ट फोटोमध्ये लागणारे पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही अगदी कुठल्याही फोटो स्टुडिओमध्ये न जाता देखील 60 ते 70 फोटो आरामात काढू शकतात. नेमके हे फोटो कसे काढावे यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 ही पद्धत वापरा आणि घ्या तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक छानशी अशी तुमची स्वतःची सेल्फी काढणे गरजेचे आहे व ती सेल्फी तुम्ही काढावी.

2- अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो काढल्यानंतर म्हणजेच फोटो क्लिक केल्यानंतर गुगल ब्राउझरमध्ये जावे आणि त्या ठिकाणी cutout pro असे टाईप करावे किंवा https://www.cutout.pro/ या लिंक वर क्लिक करावे.

3- जेव्हा तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी इमेज अपलोड नावाचा एक पर्याय दिसून येईल.

4- या ठिकाणी तुम्ही क्लिक केलेला तुमचा सेल्फी अपलोड करावा.

5- या ठिकाणचा सेल्फी अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फोटो एडिट करणे म्हणजेच त्याची पार्श्वभूमी बदलण्यापासून तर कपडे बदलणे आणि रंग सुधारणे इत्यादी अनेक पर्याय तुम्हाला दिसून येतील.

6- जर तुम्हाला या फोटोमध्ये कपडे बदलायचे असतील तर तुम्ही टीशर्ट या पर्यायावर क्लिक करावे आणि फोटोमध्ये कपडे बदलून घ्यावे. या पर्यायांमध्ये तुम्हाला अनेक फॉर्मल तसेच टी-शर्ट, शर्ट आणि सूट असे अनेक प्रकारचे पर्याय दिसतील व तुम्ही यामधून तुम्हाला हवा तो प्रकार निवडू शकता.

7- त्यानंतर यामध्ये तुम्ही इमेजची साईज 413×531 निवडावी.

8- त्यानंतर त्या फोटोची प्रिंट आऊट घेण्यासाठी तुम्हाला फोटो स्पेसिफिकेशन मध्ये तुमच्या गरजेनुसार हवा तो पर्याय निवडावा.

9- तसेच यामध्ये कागदाचा आकारासाठी तुम्हाला A4 हा आकार निवडावा आणि कोणत्याही फोटोकॉपीच्या दुकानांमध्ये जाऊन त्याची प्रिंटआउट घ्यावी.

10- ही प्रिंट आऊट घेण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 30 रुपये खर्च लागतो. परंतु या 30 रुपयांमध्ये तुम्हाला साठ ते सत्तर पासपोर्ट आकाराचे फोटो मिळतील.