Samsung Galaxy S23 FE : मस्तच.. 4500mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह सॅमसंग लाँच करणार प्रीमियम सेगमेंटचा सर्वात स्वस्त फोन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy S23 FE : सॅमसंगचा आणखी फोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे. कंपनीच्या Samsung Galaxy S23 FE या फोनमध्ये शानदार फीचर्स तसेच 4500mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसर असेल. दरम्यान कंपनीचा नवीन फोन प्रीमियम सेगमेंटचा सर्वात स्वस्त फोन असणार आहे.

त्यामुळे तुम्ही आता कमी किमतीत उत्तम फीचर्स असणारा स्मार्टफोन सहज खरेदी करू शकता. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर उत्तम पर्याय आहे. परंतु हा फोन लाँच होण्यापूर्वी त्याचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत.

कंपनीने जानेवारी 2021 मध्ये Galaxy S21 FE लाँच केला होता. परंतु त्यानंतर Galaxy S22 FE सादर केला नाही. त्यामुळे कंपनीने आपला परवडणारा स्मार्टफोन बंद केला अशी चर्चा केली जात होती. परंतु नवीनतम अहवालातून असे सूचित होत आहे की कंपनी Galaxy Fan Edition सह सुरू ठेवू शकते.

Samsung Galaxy S23 FE लॉन्चपूर्वी स्पेसिफिकेशन्स आले समोर

कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनचे अधिकृत लॉन्चपूर्वी स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हा फोन दक्षिण कोरियाच्या प्राधिकरणाच्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. परंतु या प्रमाणपत्रावरून कोणतीही तपशीलवार माहिती उपलब्ध झाली नाही.

तर दुसर्‍या अहवालात असा दावा केला जात आहे की Samsung Galaxy S23 FE चा मॉडेल नंबर SM-711B असेल, जो युरोपियन प्रकार असेल. या फोनमध्ये बॅक पॅनलवर आकर्षक कॅमेरा सेटअप उपलब्ध असणार आहे. यात प्राथमिक कॅमेरा 50MP कॅमेरा असून कंपनीकडून अजूनही या फीचर्सची पुष्टी करण्यात आली नाही.

बॅटरी

या नवीन फोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबत किती वॅट्सचा चार्जर उपलब्ध होऊ शकतो, याबाबत कोणतीही माहिती समोर अली नाही. रिपोर्ट्सनुसार, हा फोन ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सादर केली जाईल.