WhatsApp ने आता आणलेय हे तीन जबरदस्त फीचर्स !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :-  इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने तीन नवीन फीचर्स सादर केले आहेत.WhatsApp पच्या तीन नवीन वैशिष्ट्यांपैकी दोन App साठी आणि एक फिचर WhatsApp Web साठी सादर करण्यात आले आहे.

WhatsApp वेबसाठी हे फीचर कंपनीने सादर केले आहे. त्याच्या मदतीने युजर्स फोटो शेअर करण्यापूर्वी फोटो एडिट करू शकतात.

दुसरीकडे, मोबाइल App साठी सादर केलेली दोन फिचर म्हणजे स्टिकर सजेशन आणि चॅट दरम्यान प्रीव्यू लिंक पर्याय.

WhatsApp ने आपले नवीन फिचर सादर करताना म्हटले आहे की, “आम्हाला माहित आहे की आरामदायक वाटणे हा स्वतःला व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळेच लोक मित्र आणि कुटुंबियांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp चा वापर करतात.”

WhatsApp ने पुढे सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही WhatsApp मध्ये काही नवीन फिचर जोडण्यावर काम करत आहोत जे वापरकर्त्यांना सर्वोत्तम अनुभव देतात.

मेटा च्या मालकीची असलेली कंपनी WhatsApp ने मेसेजिंग प्लॅटफॉर्मची तीन नवीन फिचर ट्विटरवर एक फोटो शेअर करून सांगितली आहेत- डेस्कटॉप फोटो एडिटर , स्टिकर सजेशन आणि प्रीव्यू लिंक फेसबुकने यापूर्वी आपल्या कंपनीचे नाव बदलून मेटा केले आहे.

WhatsApp वेब फोटो एडिटर फिचर :- WhatsApp च्या मोबाइल App वर, वापरकर्ते याआधी क्रॉप, रोटेट आणि इमोजी किंवा स्टिकर्स आणि मजकूर यासारख्या साध्या मूलभूत बदलांसह फोटो पाठवू शकत होते. आता नवीन फीचरसह, वापरकर्ते WhatsApp वेबवर फोटो एडिट करून पाठवतात. यापूर्वी WhatsApp वेबवर फोटो एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता.

स्टिकर सजेशन :- स्टिकर जजिंग फीचर मेसेजिंग दरम्यान WhatsApp वर इमोजी सेट करण्याच्या सजेशनप्रमाणेच आहे. असेच सजेशन आता स्टिकर्स पाठवण्यासाठीही उपलब्ध असतील. उदाहरणार्थ, तुम्ही HaHa टाइप करताच, तुम्हाला हसणारे स्टिकर पाठवण्याचे सजेशन मिळतील.

प्रीव्यू लिंक :-  WhatsApp ने प्रिव्ह्यू लिंक फीचर अपडेट केले आहे. आता जर एखाद्या वापरकर्त्याने तुम्हाला लिंक पाठवली,

तर तुम्हाला त्या लिंकसह अधिक माहिती मिळते जेणेकरून तुम्हाला कळेल की या लिंकमध्ये काय आहे. अशा प्रकारे, वापरकर्ते कोणतीही चुकीची लिंक उघडण्यापासून वाचतील.