Maharashtra Weather: नवीन वर्षात कसे राहील महाराष्ट्राचे हवामान? वाढेल थंडीचा जोर की होईल कमी? वाचा तज्ञांनी दिलेली माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather:- सध्या महाराष्ट्रमध्ये सगळीकडे थंडीचा कडाका जाणवत असून वाढती थंडी आणि मोठ्या प्रमाणावर धुके पसरल्याची सद्यस्थिती आहे. त्यातच आज 2023 चा शेवटचा दिवस असून उद्यापासून नवीन वर्ष म्हणजेच 2024 वर्षाची सुरुवात होणार आहे.

त्यामुळे या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हवामान कसे राहील? थंडीचा जोर वाढेल की कमी होईल? पावसाची शक्‍यता आहे का? इत्यादी बाबत महत्त्वाची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. त्यासंबंधीचीच महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 नवीन वर्षात कसे राहील महाराष्ट्राचे हवामान?

उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवर राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असणार असून थंडीचा कडाखा काहीसा कमी राहील अशा पद्धतीची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 17, विदर्भातील नागपूर, गोंदिया,

अमरावती आणि भंडारा तसेच गडचिरोली अशा एकूण 22 जिल्ह्यांमध्ये एक ते सात जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात किंचित ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.

जर आपण महाराष्ट्राचे सकाळचे किमान तापमान पाहिले तर ते 16 डिग्री सेंटीग्रेड आणि कमाल तापमान 30 डिग्री सेंटीग्रेड दरम्यान असून एक ते सात जानेवारी म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानाची पातळी अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये विशेष प्रकारची चढ-उतार सध्या तरी दिसून येणार नाही असे देखील माणिकराव खुळे यांनी म्हटले.

सध्या उत्तर भारतामध्ये जे काही धुके पसरले आहे ते एकापाठोपाठ आदळणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांच्या झंजावातातून निर्माण झालेले आहे. परंतु या वातावरणाचा महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हीच चांगली गोष्ट असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

 देशाचे हवामान कसे राहील?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तामिळनाडू आणि केरळ मध्ये 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत पाऊस पडेल अशी शक्यता आहे व इतर राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच पंजाब आणि हरियाणा मध्ये पुढील दोन दिवस थंडीची शक्यता असून 31 डिसेंबर म्हणजे आज हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.