अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याचा ऊसतोड मजुरावर हल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील दत्त मंदिरालगत मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास ऊसतोड मजुरावर बिबट्याने हल्ला केला.

पद्मश्री विखे कारखान्याचा ऊसतोड मजूर सचिन मदन राठोड (वय २२) दुचाकीवरून आश्वीकडे येत होता. प्रतापपूर शिवारातील दत्त मंदिरालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.

या तरुणाबरोबर असलेल्या दोघांनी मोठा आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या आंधारात निघून गेला. बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाच्या पायाला जखम झाल्यामुळे त्याला आश्वी आरोग्य केंद्रात दाखल केले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment