वाळूचोरांनी पोलिसांना धक्काबुक्की करत वाळूचा डंपर पळवला!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर – तालुक्यातील कामटवाडी फाटा येथे गुरुवारी दुपारी पोलिसांना धक्काबुक्की करून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पळवून नेल्याची घटना घडली. 

याप्रकरणी दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा, तसेच वाळूचोरीप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पळशी गावाकडून वाळूने भरलेला डंपर खडकवाडीकडे येत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार फसले यांना दिल्यानंतर फसले यांनी खडकवाडीकडे धाव घेतली. 

कामटवाडी फाटा येथे हे पथकाने डंपर थांबवून पाहणी केली. चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याची मागणी केली असता तशी परवानगी आढळून आली नाही. 

वाहन पोलिस ठाण्याकडे घेऊन येण्याची सूचना केल्यानंतर चालक बाळू वाघ याने वाहनाचा मालक माउली ठुबे, (रा. वडगाव सावताळ) यास तेथे बोलवून घेतले. 

माउली ठुबे तेथे पोहोचताच त्याने पोलिसांशी वाद घातला. वाहन पळवून नेताना पोलिसांनी मज्जाव केला असता माउली ठुबे याने पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment