अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरची धडक बसून तरुण ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  भरधाव कंटेनरची मोटारसायकलीला धडक बसून २२ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला, तर ४२ वर्षांची व्यक्ती जबर जखमी झाली.

ही घटना गुरूवारी नगर-मनमाड महामार्गावरील अशोका हॉटेलसमोर घडली. कंटेनर चालकाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईश्वर किसनलाल सिंह (वय ४७, रेनागिरी श्योपूर, ता. मुंडावत अलवार, जिल्हा शिरपूर, राजस्थान) हा नगर-मनमाड महामार्गाने कंटेनर (एचआर ४७ सी ८००६)

भरधाव घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकलीला (एमएच १७ एन ९९९८) जोराची धडक बसली.

यात राहुल प्रकाश लबडे (वय २२) याचा जागीच मृत्यू झाला, तर चंद्रकांत रंगनाथ दिवटे (वय ४२, दोघे राहणार निमगाव मढ, ता. येवला, जि. नाशिक) हे जखमी झाले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment