नामदार थोरात म्हणाले, संगमनेरमध्ये बाधितांची संख्या मोठी असली, तरी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल  नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेरमध्ये बाधितांची संख्या मोठी असली, तरी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खूप कमी आहे. आजारातून बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे.

थोरात साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री थोरात बोलत होते. सत्तेसाठी काँग्रेस लाचार असल्याची टीका विखे यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर मंत्री थोरात पुढे म्हणाले, विखे यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व होते. सत्तेसाठी ते कसे वागले, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी आता काँग्रेसवर आरोप करू नये.

राज्य सरकार मजबूत आहे. ते पाच वर्षे टिकणार आहे. काही मंडळी देव पाण्यात ठेवून बसली आहेत, मात्र त्यांचे मनसुबे साकार होणार नाहीत. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली चर्चा समान आघाडी सरकारच्या धोरणावर होती, ती सकारात्मक झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची गती कमी झाली आहे. कामगारांचा प्रश्न व निधीची कमतरता यामुळे निळवंडे कामाला फटका बसला आहे.

मात्र, राज्य शासन यातून लवकरच मार्ग काढून आर्थिक तरतूद करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे-नाशिक रेल्वेमार्गामुळे संगमनेर देशाशी जोडले जाणार आहे, असेही मंत्री थोरात म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment