अहमदनगर शहराची वाटचाल पुन्हा एकदा ’लॉकडाउन’ दिशेने ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : नगरमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अशा रेड झोनमधून येणार्‍यांची संख्याही वाढत आहे. त्यातच आता नगर शहरातील रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे महापालिका प्रशासन चिंतेत आहे.

कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भाग सील केल्यानंतरही रुग्णवाढीचा वेग कमी झाला नाही, तर वेळप्रसंगी नगर शहर काही दिवस बंद ठेवण्याबाबतचा विचारही समोर आला आहे.

महापालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे. शहरात गेल्या 3-4 दिवसांत तब्बल 56 करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे नगरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

शहरातील तोफखाना, सिद्धार्थनगर, नालेगाव या भागातील रुग्णसंख्या वाढल्यामुळे हा भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. आज शहराच्या आडते बाजार व तारकपूर परिसरातही बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

तोफखाना, नालेगाव व सिद्धार्थनगर या भागात सर्वात जास्त रुग्ण आढळले असल्यामुळे या भागावर महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

या भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहे. या भागातून कोणताही नागरिक शहराच्या इतर भागात प्रवेश करणार नाही, याची विशेष खबरदारी घेतली जात आहे.

शहरातील इतर भागातही रुग्ण आढळू लागल्याने नगर शहराची वाटचाल पुन्हा एकदा ’लॉकडाउन’ दिशेने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment