Ahmednagar News : गुजरातपासून अहमदनगरमधील अकोळनेर डेपोपर्यंत ७४७ किमी भूमिगत पाईपलाईन ! या पाइपमधून येणार पेट्रोल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील अकोळनेर येथे इंधन डेपो आहे. या इंधन डेपोतून नगर शहरासह शंभर किलोमीटर परिसर अंतरावर असलेल्या तालुक्यांतील पेट्रोल पंपांना टँकरद्वारे पेट्रोल डिझेल पुरवले जाते.

या डेपोतून दिवसाला साधारण ८० ते १०० टँकर भरून इंधन दिले जाते. आता या डेपोमध्ये गुजरात राज्यातील बडोदरा जिल्ह्यात कोईली येथील इंडियन ऑइल कंपनीच्या रिफायनरी प्रकल्पातून ७४७ किलोमीटर अंतराच्या भूमिगत पाइपलाइनद्वारे पेट्रोलचा पुरवठा केला जाणार आहे.

१५ फेब्रुवारी पासून याची सुरवात होणार आहे. याची प्राथमिक चाचणी जानेवारीच्या अखेरीस होणार असून याआधी याच भूमिगत पाइपलाइनद्वारे डिझेलचा पुरवठा केला जात आहे.

चोरी व भेसळीला आळा, वाहतुकीचा खर्चही वाचेल

कोईली (गुजरात) येथे इंडियन ऑइल कंपनीचा रिफायनरी प्रकल्प आहे. तेथपासून भूमिगत ७४७ किलोमीटर अंतराच्या पाईपलाईनचे काम सहा वर्षांपूर्वी सुरू झाले होते. ते काम पूर्ण झाले असून २०२३ मध्ये मार्च महिन्यात पहिल्या टप्यात

या प्रकल्पातून पानेवाडी (मनमाड) डेपोला पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या भूमिगत पाइपद्वारे इंधन आल्याने चोरीला व भेसळीला आला बसणार आहे. तसेच इंधन गळती व वाहतुकीचा खर्च देखील यामुळे कमी होणार आहे.

१८ इंची असणार ही पाईपलाईन

गुजरात मार्गे नाशिक- मनमाड-अहमदनगर सोलापूरला टाकण्यात आलेल्या १८ इंची पाइपलाइनद्वारे इंधन पुरवठा होईल. अकोळनेर येथे इंडियन ऑइल व भारत पेट्रोलियम या दोन कंपन्यांचे डेपो असून येथे रेल्वे द्वारे इंधन आणले जाते.

परंतु बऱ्याचवेळा डेपोजवळील रेल्वे लाईनवर डिझेलची चोरी होण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे आता असल्या प्रकारांना आळा बसेल.