अहमदनगर ब्रेकिंग : टँकरच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24:- टँकर पाठीमागे घेत असताना शंकर जयराम काकडे (वय 65 रा. काकडे मळा, केडगाव, अहमदनगर) यांना धडक बसली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी टँकर चालक शहादेव गहिनीनाथ दराडे (रा. काकडे मळा, केडगाव, अहमदनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास शंकर काकडे यांनी फिर्याद दिली आहे.

सकाळी साडेआठ वाजता काकडे मळा येथे शंकर काकडे फिरण्यासाठी जात होते. ज्ञानदेव काकडे यांच्या घरासमोरून ते चालत जात असताना

शहादेव दराडे याने त्याच्या ताब्यातील टँकर पाठीमागे घेतला असता पायी जात असलेल्या शंकर काकडे यांना टँकरची धडक बसून ते जखमी झाले.

जखमी शंकर काकडे यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान अपघात होताच टँकर चालक दराडे पसार झाला. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.